मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /New Year 2022: 4 राशींच्या व्यक्तींचं करिअर नव्या वर्षात बहरणार; पगारातही होणार भरघोस वाढ

New Year 2022: 4 राशींच्या व्यक्तींचं करिअर नव्या वर्षात बहरणार; पगारातही होणार भरघोस वाढ

नवी नोकरी लागण्याची आस असलेले किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या व्यक्तींना नव्या वर्षाकडून भरपूर अपेक्षा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या राशींच्या पदरात 2022 मध्ये पडणार यश?

नवी नोकरी लागण्याची आस असलेले किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या व्यक्तींना नव्या वर्षाकडून भरपूर अपेक्षा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या राशींच्या पदरात 2022 मध्ये पडणार यश?

नवी नोकरी लागण्याची आस असलेले किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या व्यक्तींना नव्या वर्षाकडून भरपूर अपेक्षा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या राशींच्या पदरात 2022 मध्ये पडणार यश?

    दिल्ली, 26  नोव्हेंबर:  महिना संपत आला असून, नवं वर्ष ( New Year 2022) अवघ्या काही दिवसांवर आलं आहे. नव्या वर्षाबद्दल सगळ्यांच्याच मनात उत्सुकता असते. नवीन वर्षाचं आपण अगदी जल्लोषात स्वागत करतो. नव्या वर्षात आयुष्यातली नकारात्मकता दूर होऊन सुख-समृद्धी यावी, असं प्रत्येकाला वाटतं. दर वर्षी प्रत्येक जण नव-नवे संकल्प करतो आणि मेहनत घेऊन ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. आयुष्यातल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात आणि येणारं वर्ष आनंदाचं जावं हीच प्रत्येकाची इच्छा असते. नवी नोकरी लागण्याची आस असलेले किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या व्यक्तींना नव्या वर्षाकडून भरपूर अपेक्षा असतात. ज्योतिषशास्त्रानुसार ( Career Horoscope New Year 2022) वृषभ, कर्क, धनू आणि कुंभ या चार राशींच्या ( Career Rashifal 2022) व्यक्तींसाठी येणारं वर्ष खूप शुभ ठरणार आहे. या राशीच्या व्यक्तींना नोकरी तर मिळेलच, पण पगारवाढीचेही शुभयोग आहेत, असं ज्योतिषतज्ज्ञांना वाटतं. याबाबतचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

    2022 हे वर्ष कर्क (Cancer) राशीच्या व्यक्तींसाठी नोकऱ्यांच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने या व्यक्तींना समस्यांना सामोरं जावं लागेल; पण जसजसं वर्ष पुढे जाईल, तसतशा या व्यक्तींच्या आयुष्यातल्या समस्या सुटत जातील आणि नोकरीच्या चांगल्या संधी निर्माण होतील. तसंच वर्षाच्या मध्यामध्ये या राशीच्या व्यक्तींना मोठा धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. वर्षाच्या अखेरीला काही जणांना सरकारी नोकरीही लागण्याची चिन्हं आहेत. कर्क राशी असलेल्या ज्या व्यक्ती व्यवसाय करतात, त्यांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. याचबरोबर त्यांच्या कामाची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे.

    साप्ताहिक राशीभविष्य: राश्यांतर; त्रिग्रही योग! सप्ताहात बदलणार अनेकांचं भाग्य

    2022 हे वर्ष कुंभ (Aquarius) राशीच्या व्यक्तींसाठी अर्थपूर्ण असणार आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात लाभ होण्याचे संकेत आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची चिन्हं आहेत. तसंच नोकरी करत असलेल्यांची करिअरमध्ये ग्रोथ होईल आणि त्यांचा पगारही वाढेल. याशिवाय, व्यवसाय करणाऱ्यांसाठी पहिले तीन महिने खूप शुभ असणार आहेत. तुम्ही नोकरी, कामाची जागा किंवा कंपनी बदलण्यास इच्छुक असाल, तर हे काम वर्षाच्या पहिल्या किंवा शेवटच्या तिमाहीत करावं. ते तुमच्यासाठी अधिक चांगलं ठरू शकतं.

    वृषभ (Taurus) राशीच्या व्यक्तींसाठी 2022 हे नवीन वर्ष शुभ फलदायी राहणार आहे. नवीन वर्षाच्या पूर्वार्धामध्ये शनी ग्रह वृषभ राशीच्या नवव्या घरात असणार आहे. त्यामुळे जे काम तुम्ही करत असाल, त्यात नशीब तुम्हाला साथ देईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना नोकरी मिळण्याची चिन्हं आहेत. नोकरदारांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील.

    ग्रहदोष दूर करण्यासाठी करा 'या' देवी-देवतांची पूजा; कशी करायची उपासना?

    धनू (Sagittarius) रास असलेल्या व्यक्तींसाठी नवं वर्ष आर्थिकदृष्ट्या विलक्षण असणार आहे. त्यांच्यासमोर कमाईच्या अनेक उत्तम संधी निर्माण होतील. तसंच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची चिन्हं आहेत. नोकरदारांची आपल्या कामामध्ये प्रगती होईल. जे व्यवसाय करत आहेत, त्यांची परिस्थिती एप्रिल महिन्यानंतर बदलू शकते. एखादं नवं काम तुम्ही सुरू करू शकता. तसंच एखाद्या व्यवसायात तुम्ही भागीदार असाल, तर सप्टेंबर महिन्यानंतरचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक असेल.

    ज्योतिष शास्त्रानुसार, या राशींसाठी नवं वर्ष हे भरभराट घेऊन येणार आहे. 2022 मध्ये काही गोष्टी निर्णायक ठरणार आहेत; मात्र त्यासाठी तुम्हाला येत्या वर्षात कठोर मेहनत घ्यावी लागेल.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya