मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य: गुरूचं राश्यांतर; वृश्चिक राशीला त्रिग्रही योग! या सप्ताहात अनेक राशींचं बदलणार भविष्य

साप्ताहिक राशीभविष्य: गुरूचं राश्यांतर; वृश्चिक राशीला त्रिग्रही योग! या सप्ताहात अनेक राशींचं बदलणार भविष्य

रविवार 21 नोव्हेंबर 2021 म्हणजेच तिथी  कार्तिक कृष्ण द्वितीया. या आठवड्यातील  महत्त्वाचे राश्यांतर  म्हणजे गुरु महाराजां चे कुंभ या स्थिर, वायू राशीत आगमन झाले आहे. या राश्यांतराचा परिणाम म्हणून 7 राशींचा भरभराटीचा काळ येणार आहे.

रविवार 21 नोव्हेंबर 2021 म्हणजेच तिथी कार्तिक कृष्ण द्वितीया. या आठवड्यातील महत्त्वाचे राश्यांतर म्हणजे गुरु महाराजां चे कुंभ या स्थिर, वायू राशीत आगमन झाले आहे. या राश्यांतराचा परिणाम म्हणून 7 राशींचा भरभराटीचा काळ येणार आहे.

रविवार 21 नोव्हेंबर 2021 म्हणजेच तिथी कार्तिक कृष्ण द्वितीया. या आठवड्यातील महत्त्वाचे राश्यांतर म्हणजे गुरु महाराजां चे कुंभ या स्थिर, वायू राशीत आगमन झाले आहे. या राश्यांतराचा परिणाम म्हणून 7 राशींचा भरभराटीचा काळ येणार आहे.

आज रविवार 21 नोव्हेंबर 2021 तिथी  कार्तिक कृष्ण द्वितीया. या आठवड्यातील  महत्त्वाचे राश्यांतर  म्हणजे गुरु महाराजां चे कुंभ या स्थिर, वायू राशीत आगमन झाले आहे. एप्रिल2022 मध्य पर्यंत गुरू कुंभ राशीत असेल. या आठवड्यात त्रिग्रही योग वृश्चिक राशीत होणार आहे. सूर्य ,बुध केतू वृश्चिकेत असणार आहेत. तसेच शनि मार्गी अवस्थेत मकर राशीत, शुक्र धनु राशीत  तर मंगळ तुला राशीत आहेत. राहू  वृषभ  राशीत असणार आहे. गुरु ग्रह हा  बुद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे. गेले काही महिने गुरू मकर राशीत नीच अवस्थेत होता. कुंभ राशीतील संक्रमण कर्क, कन्या, मीन या राशींना मध्यम फळ देईल. मात्र मेष, मिथुन, सिंह,   तुला, धनु, मकर, कुंभ या राशींना गुरू अत्यंत  शुभ फळ देणार असून  वृषभ, वृश्चिक, या राशींना मध्यम फळ देईल. पाहूया  साप्ताहिक राशी भविष्य. (लग्ना नुसार) मेष भाग्य स्थानाचा स्वामी  गुरू लाभ स्थानात प्रवेश करीत आहे. आतापर्यंत जे कष्ट घेतले  त्याचे लाभ मिळण्याचे दिवस आता आले आहेत  .गुरु ची अमृत दृष्टी पंचम स्थानावर राहील. संतती ची कामना करणार्‍या जोडप्यांना निश्चित संतती सुख मिळेल. शैक्षणिक दृष्ट्या अतिशय शुभ काळ. उत्तम प्रवास घडतील. बहिण भावाशी  सुसंवाद  होईल.  घरात शुभ कार्य  घडेल. धार्मिक आस्था वाढीस लागेल. तुमचे वाक् चातुर्य कमालीचे वाढेल. नवम दृष्टीने गुरू विवाह स्थाना कडे  पाहील. अविवाहित व्यक्ती लौकरच बंधनात अडकतील. जोडीदाराची साथ लाभेल. संबंध सुधारतील. एप्रिल पर्यंत अतिशय सुंदर  काळ  असून गुरूची उपासना केल्याने फलवृद्धी होईल. वृषभ राशीच्या दशम स्थानात प्रवेश करणारा गुरू  अडकलेले  प्रमोशन, नवीन नोकरी, स्थानबदल यासाठी  अतिशय फायद्याचा ठरेल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष अतिशय  उत्तम जाईल. नोकरीत पगारवाढ, पैतृक संपत्ती, जमीनजुमला  मिळेल. वाणी मध्ये माधुर्य येईल. गृहसौख्य उत्तम राहील. स्वतः च्या वास्तूचा योग येईल. वाहन सौख्य लाभेल. पोटाचे विकार त्रास देत असतिल तर आता त्यापासून सुटका मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. कर्ज घेतले असेल तर परतफेड कराल. एकूण शुभ काळ आहे. मिथुन गुरू बदलाची सर्वाधिक फळे मिळणारी भाग्यशाली रास. आतापर्यंत  अष्टम शनी  अणि गुरू मुळे गेली काही वर्षे अतिशय शारीरिक, मानसिक, त्रास भोगावा लागला. त्या सर्वांचे निरसन होणार आहे. भाग्य स्थानाचा कारक गुरू  तुमच्यासाठी  भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे.संतती योग, नातवंड योग येईल., परदेश गमन, धार्मिक स्थळांच्या यात्रा घडतील. आत्मविश्वास वाढेल .भावंडाची भरभराट होईल.व्यक्तिमत्त्व तेजस्वी  अणि प्रगल्भ होईल. संतती साठी अतिशय शुभ फळ देणारे वर्ष आहे. अष्टम शनीची चिंता आता कमी होईल. कर्क राशीच्या अष्टम स्थानात येणारा गुरू  परदेशी जाण्याची संधी मिळवुन देणार आहे. परिश्रमाचे फळ देईल पण संथ गतीने. शेअर बाजारात फायदा मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. स्वतःचे घर होण्याचा हा काळ आहे. मात्र  मानसिक ताण जाणवत राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.  इतरांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्या .गुरूचा जप नियमित करा. गुरूचे दान करा. सिंह सप्तम  गुरू हा वैवाहिक सौख्याच्या पर्वाची सुरवात करणार आहे. अविवाहित व्यक्तींना उत्तम स्थळ येईल. व्यापारउद्योगात नवीन संधी मिळतील. व्यवसाय उत्तम राहील. अनेक लाभ होतील. मित्र परिवार  मदत करेल. तेजस्वी  अणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व बहाल करेल. गृहसौख्य उत्तम राहील . प्रवास घडतील. बहिण भावंड भेट देतील. त्यांच्याशी संपर्क होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. लग्नाचा स्वामी रवि चतुर्थ स्थानात घर अणि वाहन संबंधी सौख्य प्रदान करेल. कन्या राशी स्वामी बुध  वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे बुद्धी ,पराक्रम अणि ओजस्वी वाणी यात वाढ होईल. चतुर्थ अणि सप्तम भावांचा स्वामी गुरू  षष्ठ स्थानात आला आहे .घरा संबंधी काही घटना घडतील. घर दुरुस्ती, वाहन खरेदी आदी होईल. परदेश प्रवास संबंधी नवीन संधी येतील. पोटा संबंधित काही विकार असले तर त्याचे नक्की समाधान होईल. नोकरीमध्ये सुसंधी प्राप्त होतील. मात्र  व्यय होण्याची शक्यता आहे .गुरूची उपासना करावी  जप व दान करावे. तुला राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात असून कलाकारांना शुभ फळ देणारा ठरेल.रवी बुध धनस्थानात आर्थिक लाभ  मिळवुन देतील. राशीच्या पंचमात येणारा गुरू घरात गोड बातमी आणेल. उच्च शिक्षण, नवीन काही शिकण्याची संधी मिळवुन देईल  मुलांना अतिशय शुभ फळ देणारे ग्रहमान आहे. सामाजिक कामांमधे पुढाकार घेतला जाईल. नावलौकिक होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. लाभाची नवीन दालने उघडतील. कुटुंबात वृद्धी होईल. भरभराटीचा काळ. वृश्चिक राशीत असलेला रवि बुध शुभ फळ देईल. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. चेहर्‍यावर तेज येईल. द्वितीय अणि पंचम भावांचा स्वामी गुरू चतुर्थात आला आहे. नवीन वास्तु संबंधी निर्णय होईल. आई वडीलांना स्वास्थ्य लाभ होईल. ऑफिस मध्ये तुमचा अधिकार वाढेल. प्रमोशन किंवा ग्रेड वाढेल. आर्थिक गणितं जुळून येतील. वाहन सुख भरपूर लाभेल .मुलं मनासारखी वागतील. घरात शुभ कार्याचे नियोजन कराल. प्रकृती सुधारेल.  सखोल अभ्यास कराल .एकूण शुभ फळ देणारा काळ आहे. धनु राशी च्या व्यय स्थानात रवि बुध कायद्याचे उल्लंघन करू नका असे सुचवीत आहे. आर्थिक शारीरिक त्रास संभवतात. मात्र राशी स्वामी गुरू तृतीय स्थानात  प्रवेश करून  लांबचे प्रवास योग आणेल .काही नवीन ओळखी होतील. नातेवाईकांना भेट द्याल. बुद्धी पराक्रम यात वाढ होईल. प्रसार  माध्यमाशी संबंधित व्यक्ती प्रकाशात येतील .संवाद,संपर्क होतील  .भावंडाची प्रगती होईल. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. लाभदायक काळ. मकर राशीतील शनी आता मार्गी झाला असुन गुरू धन कुटुंब वाणी स्थानात प्रवेश करीत आहे. आतापर्यंत भोगलेल्या  अनेक त्रासाचा आता  शेवट होईल. कौटुंबिक सुख लाभेल. वाणी मध्ये माधुर्य, ओज येईल  जे बोलाल ते घडेल  शुभ वचने बोला. पैतृक संपत्ती मिळेल. दागदागिने, ऐश्वर्य प्राप्तीचा काळ आहे. नोकरी पेशा व्यक्तींना नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळेल. मामा कडुन लाभ होण्याची शक्यता आहे. कर्ज फेड होईल. प्रकृती उत्तम राहील.गुरु उपासना करावी. कुंभ राशीत आलेला गुरू  कुंभ व्यक्तींसाठी सुखाचे दिवस आणणार आहे  मुळा मुलींची लग्न ठरतील. संतती सुख चांगले राहील. घरात नवीन बाळाचे आगमन होईल. धार्मिक कार्य घडेल.जोडीदाराची प्रगती संभवते.वैवाहिक संबंध मधुर होतील . विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील.आणि होतील देखील. परदेश प्रवास संबंधी काही निर्णय होतील. गुरू बदल शुभ फळ देणार आहे. लाभ घ्यावा. मीन राशी स्वामी गुरू व्यय स्थानात आला आहे.  आर्थिक व्यय भरपूर होणार असून प्रकृतीची काळजी घ्या. प्रवास सांभाळून करा. परदेशी जाण्याचे मनसुबे खरे होतील. नवीन घरा संबंधी प्रयत्‍न करत असाल तर यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. आई वडीलांच्या प्रकृती मध्ये सुधारणा होईल. शत्रू पराजित होतील.  कोर्ट कचेरी च्या कामा मध्ये यश लाभेल  .कर्जमुक्ती संभवते. अध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. गुरूचे जप अणि दान करावे. गुरू मंत्र: ॐ  ब्रीम बृहस्पतये नमः गुरू दान: चणा डाळ, गूळ, पिवळे वस्त्र, सोने. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या