मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Mangal Gochar : 27 जूनला मंगळ बदलणार रास; या व्यक्तींच्या आयुष्यात होणार उलथापालथ

Mangal Gochar : 27 जूनला मंगळ बदलणार रास; या व्यक्तींच्या आयुष्यात होणार उलथापालथ

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

मंगळाच्या भ्रमणाचा परिणाम अनेक राशींच्या जीवनावर होणार आहे. काही राशीच्या लोकांना या भ्रमणाचा (Mangal Transit In Mesh Rashi 2022) फायदा होईल. तर काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ होईल.

मुंबई 26 जून : ज्योतिषशास्त्रात सर्वच ग्रह महत्वाचे मानले जातात. त्या त्या परिस्थितीनुसार, प्रत्येक ग्रहाचे महत्त्व ठरत असते. याचप्रमाणे मंगळाचेही ज्योतिषशास्त्रात विशेष स्थान आहे. 27 जून रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश (Mangal Transit In Mesh Rashi 2022) करणार आहे. मंगळाच्या भ्रमणाचा परिणाम अनेक राशींच्या जीवनावर होणार आहे. काही राशीच्या लोकांना या भ्रमणाचा (Mangal Grah Rashi Parivartan) फायदा होईल. तर काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात उलथापालथ होईल. बघूया मंगळाच्या भ्रमणाचा (Mangal Gochar 2022) कोणत्या राशीवर काय परिणाम होईल.

सर्वप्रथम मेष रास. मेष राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच त्यांना पालकांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. यादरम्यान मेष राशीच्या लोकांना प्रवासही घडू शकतो. त्यानंतर येते वृषभ. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर नोकरीतही अडचणी येऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल. आता पाहूया मिथुन राशीच्या लोकांवर मंगळाच्या भ्रमंतीचा काय परिणाम होईल. मिथुन राशीच्या लोकांना या काळात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आईची साथ मिळण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यात रस वाढेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे या काळात विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

 Fish Aquarium: तुमच्या एक्वेरियममधील मासे लगेच मरतायत? या 5 टिप्स कायम ध्यानात ठेवा

आता कर्क रास. राशीच्या लोकांना शिक्षणाशी संबंधित कामात सुखद परिणाम मिळतील. व्यावसायिक कामातून उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर योग जुळून येत आहे. खर्च वाढतील. नवीन मित्र बनू शकतात. यानंतर सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी नोकरीत बॉसशी चांगले संबंध ठेवा. प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात वाढ होऊ शकते. तुम्हाला सन्मान मिळेल. स्थलांतराची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन मित्र बनण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायात सुधारणा होऊ शकते. या दरम्यान, व्यवसायात गर्दी होऊ शकते. परंतु ते फायदेशीर ठरेल.

आता पाहुयात तूळ राशीच्या लोकांवर मंगळाच्या भ्रमंतीचा काय परिणाम होतो. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, तूळ राशीच्या लोकांनी आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्याच वेळी, व्यवसायात अडचणी येऊ शकतात. शिक्षणाशी संबंधित कामांवरही लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत तुम्हाला बॉसचे सहकार्य मिळेल. पण कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अनेक अडचणी घेऊन येत आहे. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर व्यवसायात बदलाचे योग दिसत आहेत. या काळात कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आजारपणात पैसा खर्च होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. त्याचप्रमाणे धनु राशीच्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होऊ शकतो. या काळात कामांतूनदेखील पैसा मिळू शकतो. व्यवसायात वाढ होईल.

Good Husband : पत्नीच्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करतात या 5 आद्याक्षराचे पतीदेव

मकर राशीचे लोक या काळात धार्मिक कार्यात व्यस्त असतील. कौटुंबिक खर्चात वाढ झाल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीदरम्यान परदेशात जाण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी या मंगळ भ्रमणामध्ये शैक्षणिक कार्याचे चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात मित्राशी संपर्क साधता येईल. नोकरीत परदेशात जाण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या भ्रमणात कुटुंबासह धार्मिक प्रवासाचे योग बनत आहेत. उत्पन्न कमी, खर्च जास्त असू शकतो. व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुम्ही प्रवास करू शकता, जे फायदेशीर ठरेल.

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Mars, Rashibhavishya