मुंबई, 2 जून: ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासानुसार, प्रत्येक राशीला (Zodiac Sign) ग्रहयोगांमुळे वेगवेगळी फळं मिळत असतात. ग्रहदशा चांगली असेल, तर चांगली फळं मिळतात, ग्रहदशा बिघडली तर वाईट फळंही मिळू शकतं. सध्याच्या काळात आरोग्य आणि आर्थिकस्थिती हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यादृष्टीने आगामी काळात आपल्या राशीचं भविष्य काय आहे हे जाणून घेतल्यास त्यानुसार आधीच उपाययोजना करता येतील.
मेष (Aries) - या राशीच्या लोकांसाठी जून महिना आर्थिकदृष्ट्या चांगला ठरणार आहे. कमाईत वाढ होणार असून, उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. सरकारी तसंच व्यापार आणि स्वयंरोजगार या क्षेत्रामध्येही चांगल्या संधी मिळतील. नवीन कामातही फायदा होईल. बचत करण्यातही यश मिळेल.
वृषभ (Taurus) - या महिन्यात आर्थिक दृष्ट्या फारसा बदल होणार नाही. महिन्याच्या सुरुवातीला आवक चांगली असेल. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. पैशाची देवाण घेवाण करू नका, तसंच गुंतवणूकीपासूनही सध्या दूर रहा.
मिथुन (Gemini) - आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी मध्यम राहील. खूप फायदाही होणार नाही आणि खूप तोटाही होणार नाही. खर्च वाढतील. गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
कर्क (Cancer) - या महिन्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संमिश्र फळ मिळेल. तुमचं उत्पन्न वाढेल, पण त्याचवेळी खर्चही वाढतील. काही खर्च अचानक उद्भवू शकतात. या महिन्यात बजेट नुसार खर्च करणं योग्य ठरेल. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo) - उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून, उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होतील. कमाईही चांगली होईल आणि कोणता मोठा खर्च उद्भवण्याचीही शक्यता नाही. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवा. चांगली गुंतवणूक करू शकाल. आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला जाणार आहे.
कन्या (Virgo) - आर्थिकबाबतीत या महिन्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. काही योजना पुढं ढकलाव्या लागतील. कोणालाही पैसे उसने देऊ नका. नुकसान होण्याची शकयता आहे. व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाभादायी ठरेल.
तूळ (Libra) - आर्थिकदृष्ट्या हा महिना अगदी उत्तम ठरणार आहे. नेहमीच्या स्रोतातून उत्पन्न मिळेलच, पण नवीन मार्गही उपलब्ध होतील. नोकरीत पगारवाढ मिळेल. नोकरी बदलल्यानं चांगली वाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला फायदा होईल.
वृश्चिक (Scorpio) - या राशीसाठी हा महिना त्रासाचा ठरणार आहे. कमाईपेक्षा खर्च अधिक होईल. विनाकारण खर्च करण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक संकट ओढवेल. जितकी मेहनत कराल तितकीच प्राप्ती होईल.
धनु (Sagittarius) - तुम्ही प्रयत्न केले तरच तुमचं उत्पन्न वाढेल. यासाठी तुमची कौशल्यं, कार्यक्षमता वाढवावी लागेल. या महिन्यात आकस्मिक खर्चही उद्भवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
मकर (Capricorn) - हा महिना तुमच्यासाठी अगदी उत्तम ठरणार आहे. भरघोस कमाई होईल, त्यामानाने खर्च कमी होईल. चांगली बचत करू शकाल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळेल. गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.
कुंभ (Aquarius) - सगळ्या चिंता दूर होतील. कमाई उत्तम होईल. खर्चाचे प्रमाण अधिक असण्याची आणि अचानक काही खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला फायदा होईल. विचारपूर्वक गुंतवणूक करा.
मीन (Pisces) - या राशीच्या लोकांसाठीही हा महिना चांगला लाभदायी ठरणार आहे. नोकरी- व्यवसायात आर्थिक दृष्ट्या चांगला फायदा होईल. उत्पन्नात वाढ होईल. नियमित उत्पन्नासह अन्य मार्गांनीही उत्पन्न मिळेल. खर्चात थोडी वाढ होण्याचीही शक्यता आहे. आकस्मिक खर्चही उद्भवू शकतो. मात्र आर्थिक विवंचना नसेल. आर्थिक कामात अडथळे येण्याचीही शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya