• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Chanakya Niti: कठीण काळात लक्षात ठेवा या 6 गोष्टी; आयुष्य होईल सफल

Chanakya Niti: कठीण काळात लक्षात ठेवा या 6 गोष्टी; आयुष्य होईल सफल

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते सर्वशक्तिमान (Almighty) तोच आहे ज्याची बुद्धी योग्य काम करते आणि त्याच्या कर्मावरती नियंत्रण ठेवते.

  • Share this:
    दिल्ली, 2 जून : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीती कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी, कुटनीती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येक जण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya)  म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. चाणक्य नीति सांगते ज्याप्रकारे राखेने घासल्यामुळे पितळेचं भांडं चमकतं, तांब्याला चिंचेने घासल्यामुळे चमक येते, नदी वाहत राहिली तर स्वच्छता राहते. त्याचप्रकारे आयुष्यात दुःख आणि कठीण प्रसंग आले तर, माणसाचा आयुष्य सोन्याप्रमाणे सुंदर बनतं. जाणून घेऊयात चाणक्य नीतिच्या काही महत्त्वाच्या गोष्टी श्रवण केल्याने ज्ञान वाढते चाणक्य नीति सांगते की, श्रवण करणं हा चांगला गुण आहे. कारण श्रवणाने धर्माचं ज्ञान वाढतं.मनातील द्वेष दूर होतो आणि ज्ञानाची प्राप्ती होते. कोणत्याही वासने पासून मुक्ती मिळते. ( Post COVID-19: कोरडा खोकला आणि कफामुळे हैराण;या टिप्स नक्की वापरा) मार्गावरून दूर झाल्यास अपयश आचार्य चाणक्य यांच्या मते राजा, ब्राह्मण आणि तपस्वी,योगी जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये भटकंती करतात, फिरतात तेव्हा त्यांना ज्ञान आणि आदर प्राप्त होतो. मात्र माणूस आपल्या चांगल्या मार्गावरून दूर झाला तर, तो बरबाद होतो. धनवान व्यक्तीला मित्र संग्रह चाणक्य नीतिनुसार धनवान व्यक्तीकडे मित्रही आणि अनेक नातलग देखील असतात. हे लोक धनवान लोकांना जास्त महत्त्व देतात. कारण ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडेच सुविधाही उपलब्ध असतात. (कसं, कुणी आणि कधी घ्यावं 2DG? कोरोना औषधाबाबत जरूर वाचा DRDO च्या सूचना) बुद्धीचा इच्छेवर ताबा आचार्य चाणक्य यांच्यामध्ये सर्वशक्तिमान माणूस तोच आहे ज्याच्या इच्छेनुसार त्याची बुद्धी काम करते. ज्याची बुद्धी त्याच्या कर्मांना नियंत्रित करते. मदत करणारे लोक सुद्धा त्याच्याजवळ येता. (EXPLAINER: कोरोनाची लस तुम्हाला किती दिवस सुरक्षित ठेवेल? जाणून घ्या काय सांगतात) कुशलता महत्वाची चाणक्य नीतिनुसार काळाबरोबर माणूस सर्व गोष्टी शिकतो आणि ज्ञान असेल तर, सगळ्या लोकांना मदत करता येते. काळावर कोणालाच विजय मिळवता येत नाही. सतत जागृत असणारा माणूसच विजयी होतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published: