मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: आज वृषभ आणि तुला राशीसाठी नवीन वस्तूंची खरेदी करण्याचा दिवस, वाचा कसा असेल तुमचा दिवस?

राशीभविष्य: आज वृषभ आणि तुला राशीसाठी नवीन वस्तूंची खरेदी करण्याचा दिवस, वाचा कसा असेल तुमचा दिवस?

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

आज शनिवार दिनांक 24 जुलै 2021 तिथी आषाढ पौर्णिमा/आषाढ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज  शनिवार दिनांक 24 जुलै 2021 तिथी आषाढ पौर्णिमा/आषाढ कृष्ण प्रतिपदा. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज घरांमधे  अनेक महत्त्वा च्या घडामोडी होतील. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होऊन काम सुरळीत होईल. धार्मिक कार्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम यात सहभाग घ्याल. आज दिवस शुभ आहे.

वृषभ

आज दोन दिवस जाणवणारा निरुत्साह संपून नवीन उत्साह येईल. भाग्याचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खरेदीचा आनंद घ्याल. दिवस चांगला जाईल.

मिथुन

अती दगदग अणि ताण यामुळे  आज तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. राशीतील बुध गुरूशी शुभ योग करीत आहे. बुद्धी आणि चातुर्य यामुळे भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

कर्क

राशीतील सूर्य सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करून देतील. काम पटापट होतील. बुद्धी चा उपयोग  चांगल्या कामासाठी करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती साठी शुभ आहे. दिवस चांगला जाईल.

सिंह

आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण, दिवस थोडा संथ आणि कंटाळवाणा जाईल. मंगळ स्वभाव थोडा चिडचिडा करेल. आज जोडीदाराला वेळ द्यावा. त्यांची मदत घेऊन काही कामे पुढे जातील. दिवस शुभ.

कन्या

आज संतती साठी कठीण दिवस असून त्यांना मदत करावी लागेल. पंचमात शनि चंद्र काही आध्यात्मिक वाचन, लेखन यासाठी उत्तम राहील. खूप गडबडीत हा दिवस जाईल. पोटाची काळजी घ्या.

तुला

आज शनिवार अगदी शांतपणे घालवा. खुप दगदग झाली आहे त्यामुळे आता आराम करा.

घरा साठी काही खरेदी, काही काम कराल. संतती सुख चांगले. आर्थिक  व्यवहार जपून करा  दिवस चांगला.

वृश्चिक

आज दिवस भटकंतीचा आहे. घरी अचानक पाहुणे येतील  बहिण भावाशी गाठ भेट होईल. वातावरण आनंदाने भरून जाईल. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस चांगला.

धनु

आज दिवस भरभराटीचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे खुप सहकार्य मिळेल. अष्टमात सूर्य  सरकारी कामात अडचण निर्माण करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस शुभ आहे.

मकर

आज राशीतील चंद्र आणि मंगळ षडाष्टक योग करीत आहेत. जरा जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून लाभ होईल. मुलं मनासारखी वागतील. दिवस चांगला जाईल.

कुंभ

व्ययस्थानातील चंद्र आज जरा थकवा आणि खर्च दाखवत आहे. जास्त दगदग करू नका. प्रवास टाळा. जोडीदाराची काळजी घ्या. वादावादी होऊ शकते. दिवस मध्यम आहे.

मीन

षष्ठ मंगळ आणि बाराव्या गुरूचे प्रभाव क्षेत्र आहे, अतिशय खर्च  करावा लागेल. त्यासाठी आज काही तरतूद करून ठेवा. अर्थात तो खर्च आनंद देणारा असेल. लाभ  ही होतील. संतती सुख मिळेल. दिवस शुभ आहे.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs