मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: आज कन्या आणि मकर राशीच्या लोकांना प्रकृतीची घ्यावी लागणार काळजी; गुरुपौर्णिमा कशी असेल वाचा भविष्य

राशीभविष्य: आज कन्या आणि मकर राशीच्या लोकांना प्रकृतीची घ्यावी लागणार काळजी; गुरुपौर्णिमा कशी असेल वाचा भविष्य

आज शुक्रवार दिनांक 23 जुलै 2021 .आज गुरुपौर्णिमा. आद्य गुरू श्री वेद व्यासांना नमस्कार करून आजचे राशी भविष्य बघू या .

आज शुक्रवार दिनांक 23 जुलै 2021 .आज गुरुपौर्णिमा. आद्य गुरू श्री वेद व्यासांना नमस्कार करून आजचे राशी भविष्य बघू या .

आज शुक्रवार दिनांक 23 जुलै 2021 .आज गुरुपौर्णिमा. आद्य गुरू श्री वेद व्यासांना नमस्कार करून आजचे राशी भविष्य बघू या .

आज शुक्रवार दिनांक 23 जुलै 2021 .आज गुरुपौर्णिमा. आद्य गुरू, श्री वेद व्यासां ना नमस्कार करून आजचे राशी भविष्य बघू या. आज चंद्र धनु राशीत असेल.

मेष

आज गुरुकृपा  होण्यासाठी उत्तम दिवस आहे. भाग्य स्थानातील चंद्र आध्यात्मिक उन्नती साठी मदत करेल. पंचमस्थ मंगळ हातून काही तरी  भरघोस  कार्य घडेल. कौटुंबिक सुख मिळेल. दिवस शुभ आहे.

वृषभ

आज आपल्या गुरूंच्या कृपा प्रसादामुळे  अष्टम चंद्र  सुसह्य होईल. वाणी मध्ये गोडवा आणि तेज राहील. घरातल्या प्रत्येकाचा विचार करून काम  करावे..  कार्य क्षेत्रात मदत मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस मध्यम आहे.

मिथुन

आज जोडीने गुरूंचा आशीर्वाद प्राप्त कराल. लहानसहान कुरबुरी सुरू राहतील. भावंडाची तक्रार असेल. राशीतील बुध उच्च  बुद्धिमत्ता प्रदान करण्यास उत्तम. आर्थिक बाजू चांगली राहील. आरोग्य थोडे  जपा.

कर्क

आज गुरूचरणी लीन होऊन  दिवस  प्रार्थना आणि पूजा या मध्ये जाईल. आज कोणाशीही वाद नको. आर्थिक घडामोडी, निर्णय पुढे जाऊ द्या. गुरुकृपा व्हावी म्हणून गुरु जप व दान करा. दिवस  मध्यम आहे.

सिंह

राशीतील मंगल शुक्र चैनी कडे कल ठेवतील  खर्च आटोक्यात ठेवा. रागावर नियंत्रण राहू द्या. गुरु कृपा आहेच  पण आज विशेष साधना करावी. आध्यात्मिक दिवस  शुभ आहे.

कन्या

आज दिवस  दुसर्‍यांची सेवा करण्यात जाईल. घरात खूप काम  निघेल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती कडे लक्ष द्या  मंगळ व्यय स्थानात असून खर्च वाढवेल. तुमच्या  बुद्धीचा उपयोग कार्य क्षेत्रात होईल. शुभ फळ मिळेल.

तुला

आज  दिवस नामस्मरण करण्यात घालवा. पुढील दिवसाचे  नियोजन करा. दशमातील सुर्य शनि प्रतियोग कार्यक्षेत्रात अडचणी  निर्माण करेल. पण सध्या काहीही निर्णय घेऊ नका. वाद नको. दिवस चांगला जाईल.

वृश्चिक

कुठूनतरी येणारा पैसा  टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्‍न करा. दशमातील मंगळ  अचानक जोरदार संधी मिळवुन  देणार आहे .लाभ होतील. मात्र विपरीत बुद्धी  ,निर्णय नको .गुरु उपासना सुरू करावी.

धनु

तुमची रास गुरूची आहे  आज उपासनेत वेळ घालवा. पुढील साधनेसाठी अतिशय शुभ दिवस. बुध गुरू प्रतियोग लेखक, व्यावसायिक, ज्योतिषी यांना यशदायक आहे. गूढ अनुभव येतील. दिवस  उत्तम.

मकर

आज चंद्र  उच्च आध्यात्मिक अनुभुती  मिळवुन देईल. प्रयत्‍न पूर्वक गुरु उपासना करावी. अष्टमात मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवतो आहे. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम जाईल

कुंभ

आज दिवस  उच्च आध्यात्मिक अनुभव  घेण्याचा आहे. तुम्ही प्रयत्‍न करा. गुरु राशीत असुन बुधा शी  नव पंचम योग करीत आहे. नोकरीत उत्तम संधी, व्यवसाय भरभराटीचा असा हा दिवस शुभ फळ देईल

मीन

गुरूची प्रिय रास, आणि या सात्विक राशीच्या  व्यक्तींना दिवस बिझी जाईल. काम खूप वाढेल. पण त्याचे उत्तम फळ मिळेल. गुरु कृपा  होण्यासाठी आज गुरूचे दान आणि जप करावा. दिवस शुभ आहे.

शुभम  भवतु !!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya