जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

पुष्कराजला स्वस्त आणि उत्तम पर्याय सुनेहला स्टोन; उघडतील यशाचे दरवाजे

पुष्कराज (Yellow Sapphire) रत्न हे अतिशय महाग रत्न असतं त्यामुळे बजेटमध्ये नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुनहेला रत्न (Citrine Stone) धारण करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : पुष्कराज  (Yellow Sapphire) गुरु ग्रहाचं रत्न मानलं जातं. हे धारण करण्याने गुरुची कृपा होऊन शुभ फळ मिळतं अशी ज्योतिषशास्त्रानुसार (According to Astrology)   मान्यता आहे. मिथुन,कन्या आणि वृषभ राशीच्या लोकांनी (Zodiac Signs) पुष्कराज धारण करावा. मात्र हे रत्न महाग असतं त्यामुळे सर्वांनाच धारण करता येत नाही. पुष्कराज रत्नाला पर्याय म्हणून सुनेहला रत्न धारण करता येतं. हे रत्न पुष्कराजपेक्षा स्वस्त असतं तरी तितकच प्रभावशाली मानलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार सुनेहला रत्न धारण केल्यामुळे मानसन्मान ज्ञान आणि संपत्तीत वाढ होते. पुष्कराजचं हे उपरत्न मानलं जातं. त्याच्या सारखंच पिवळ्या रंगाचा हे रत्न करियर आणि व्यापारामध्ये यश मिळवण्यासाठी धारण करतात. बिझनेसमध्ये नुकसान होत असेल तर, फायदा होण्यासाठी सुनेहला रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. ( श्रावणातल्या उपवासासाठी नक्की खा हा पदार्थ; आहेत बरेच फायदे ) धारण करण्याने फायदा हे रत्न धारण करण्याने बुद्धी वाढते अशी मान्यता आहे. आर्थिक फायद्यांशिवाय संशोधन करणाऱ्यांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे रत्न लाभदायक आहे. कारण याने अभ्यासात एकाग्रता वाढते. या रत्नामुळे राग शांत होतो आणि हे रत्न हार्मोन्स कंट्रोल देखील करू शकतं. मानसिक ताणावात असणाऱ्या व्यक्तीने सुनेहला रत्न धारण करावं. ( आज आहे वर्षातली पहिली मंगळागौर; काय आहे या व्रताचं महत्त्व आणि पूजा विधी ) **धारण करण्याच**ा विधी सुनेहला रत्न गुरुवारी गुरूच्या पोटालामध्ये धारण केल्याने फायदा मिळतो. याशिवाय याची अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट बनवून धारण केलं तरी फायदा होतो. ( स्वप्नातलं घर खरेदी करताय? कागदपत्रांसदर्भात अजिबात विसरू नका या 5 गोष्टी ) धारण करण्याआधी तांब्याच्या भांड्यात गंगाजल, गाईचं दूध, तुळशीची पानं, मध आणि आणि तूप घालून त्यात बुडवून ठेवावं. रत्न धारण करताना 108 वेळा ‘ऊं ग्रां ग्रीं ग्रूं गुरुवे नम:’ हा जप करावा. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात