JOIN US
मराठी बातम्या / Viral / तुम्हीसुद्धा घेतलंय #CoupleChallenge? ओढवू शकतं मोठं संकट; पोलिसांनीचं सांगितलं कारण, पाहा VIDEO

तुम्हीसुद्धा घेतलंय #CoupleChallenge? ओढवू शकतं मोठं संकट; पोलिसांनीचं सांगितलं कारण, पाहा VIDEO

या चॅलेंजमध्ये फोटो शेअर केल्यानंतर काय आहे धोका? महाराष्ट्र पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली सत्य परिस्थिती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 फेब्रुवारी : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेन्ड व्हायरल होत असतात. नेटकरीही या चॅलेंजला बळी पडून आपले फोटो सोशल मीडियावर चॅलेंजला टॅग करीत शेअरही करतात. मात्र याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. याबाबत पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मजा म्हणून घेतलंल हे चॅलेज भविष्यात मोठं संकट निर्माण करू शकतं. सध्या व्हेलेंटाइन डे निमित्ताने फेसबुकवर कपलचॅलंज सुरू आहे. आपल्या जोडीदारासोबतचा फोटो शेअर करीत टॅग केलं जात आहे. ज्यांनी अशा प्रकारचं चॅलेज स्वीकारलं त्यांच्यासाठी आणि जे हे स्वीकारू इच्छितात त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र पोलिसातील सोमनाथ कदम यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चॅलेजमधून आत्महत्या, ब्लॅकमेलिंगसारख्या घटना घडू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही चॅलेंजला बळी पडू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

सोशल मीडिया आणि सायबर क्राइममध्ये वाढणारी गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी यासंदर्भात सर्व वापरकर्त्यांना इशारा दिला आहे. या चॅलेंजमध्ये शेअर केलेल्या फोटोचा  चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या चॅलेंजचा बळी न पडला फोटो शेअर करू नये असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. या चॅलेंजच्या नादात हॅकर्सला बळी पडू नये यासाठी अधिक सावधान राहण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या