साड्यांसाठी महिलांची हाणामारी
बंगळुरू, 24 एप्रिल : शॉपिंग म्हणजे बऱ्याच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही कुठे सेल लागला असेल तर तिथं अशा महिला आवर्जून जातात. अशाच एका दुकानात साड्यांचा सेल लागला. जिथं साड्यांसाठी महिला अक्षरशः एकमेकींच्या जीवावर उठल्या. दुकानात सेलच्या साड्या खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांनी दुकानातच राडा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. महिलांचं भांडण तसं नवं नाही. सार्वजनिक नळ असो वा मुंबईची लोकल तिथं महिलांना भांडताना तुम्ही पाहिलं असेल. पण आता तर महिलांनी मॉलही सोडला नाही. मॉलमध्ये साड्यांचा सेल लागला. तिथंही महिला मारहाण करताना दिसल्या. व्हिडीओ पाहून तुमचीही या भांडणावरून नजर हचणार नाही.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता साड्यांचा सेल लागताच त्या खरेदी करण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे. स्कूटी चोरायला आले अन् भयंकर घडलं, स्वतःचीच गाडी सोडून पळाले चोर; पाहा VIDEO सर्व महिला दसऱ्याला सोनं लुटावं तशा साड्या लुटत आहेत. प्रत्येकीच्या हातात साड्यांचा गट्टा दिसेल. सेलमध्ये गजबजाटही ऐकू य़ेतो आहे, इतक्यात काही महिला मोठमोठ्याने ओरडत असल्याचा आवाज येतो. तुम्ही नीट पाहिलं तर मागच्या बाजूला महिलांची हाणामारी सुरू आहे. एका महिलेच्या हातात साड्या आहेत, ती त्या साड्यांना घट्ट धरून आहे. तर दुसरी महिला तिच्यावर तुटून पडली आहे आणि तिच्या हातातील साड्या हिसकावण्याचा प्रयत्न करते आहे. पण महिला काही त्या साड्या सोडत नाही. एकंदर व्हिडीओ पाहिला तर कदाचित एकच साडी आवडल्याने या महिलांमध्ये त्या साडीसाठी भांडण झालं असावं. रस्त्यावर पडलं होतं पैशांनी भरलेलं पाकिट, व्यक्तीने उचलताच…; काय घडलं पाहा VIDEO @rvaidya2000 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ कर्नाटकाच्या बंगळुरूतील आहे. मालेश्वर शोरूममध्ये हे सर्व घडलं. जिथं वर्षातून एकदा सिल्क साड्यांचा सेल लागतो आणि त्यांची मोठी विक्री होते.
हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया तसंच तुम्ही असं कधी साड्यांसाठी भांडण केलं आहे किंवा पाहिलं आहे का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.