सिंहिणीसमोर सिंहाला स्पर्श करणं महिलेला पडलं भारी (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
केपटाऊन, 03 जून : आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत दुसरी महिला दिसली की कित्येक गर्लफ्रेंड, बायकांचा तिळपापड होतो. कोणतीच महिला आपल्या लाइफ पार्टनरसोबत दुसऱ्या महिलेला पाहू शकत नाही. पण असं फक्त माणसांमध्येच होतं, असं नाही तर प्राण्यां मध्येही असं पाहायला मिळतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात एका महिलेने सिंहाला स्पर्श करताच सिंहिण चवताळली आहे. जंगलाचा राजा सिंह आणि त्याची राणी सिंहिण. म्हणायला तसा तो जंगलाचा राजा पण राणीसमोर त्याचं काहीच चालत नाही. वेळ आली तर सिंहिणी किती भारी पडू शकते, याचा तुम्ही विचारही केला नसेल. याची कल्पना तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर येईलच. ज्यात सिंह-सिंहिणीला एका महिलेने डिस्टर्ब केलं. त्यानंतर महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सिंह आणि सिंहिण एकत्र शांतपणे बसले आहेत. इतक्यात मागून एक महिला येते. महिला तशी घाबरत, दचकतच सिंहाजवळ येते. तिच्यासमोर असलेली व्यक्ती तिला घाबरू नको, असं सांगते. VIDEO - जंगलाच्या राजाचा बर्थडे! थेट सिंहाजवळ केक घेऊन गेले तरुण; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं महिला खरंतर सिंहांसोबत फोटो काढायला येते. सिंहांच्या जवळ येताच ती सिंहावर हात ठेवून पोझ द्यायला जाते. यासाठी सिंहाला स्पर्श करते. सिंहिण आधी शांतपणे सर्वकाही पाहत असते. पण जसं महिला सिंहाला स्पर्श करते, तशी सिंहिण चवताळते. ती तशीच रागात उठते आणि महिलेवर हल्ला करायला जाते. महिलाही घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी पळते. व्हिडीओत पुढे या महिलेचं काय झालं ते दाखवण्यात आलेलं नाही. पण ज्या पद्धतीने सिंहिण तिच्यामागे धावत गेली, त्यावरून तिचं काय झालं असेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. @findgoddd नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना दक्षिण आफ्रिकेतील आहे. तर यात दिसणारी ही महिला भारतीय आहे.
व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. या महिलेचं पुढे काय झालं असंही विचारलं जातं आहे. तुम्हाला काय वाटतं, सिंहाला हात लावल्यानंतर सिंहिणीने या महिलेचं काय केलं असेल? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की सांगा.