JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'हा मला चावला, माझ्यावर उपचार करा'; रुग्णालयात असं काही घेऊन आली महिला, डॉक्टरांनाही धक्का

'हा मला चावला, माझ्यावर उपचार करा'; रुग्णालयात असं काही घेऊन आली महिला, डॉक्टरांनाही धक्का

झोपून उठल्यानंतर महिलेला असं काही दिसलं की ते घेऊन ती रुग्णालयात पोहोचली, जे पाहून डॉक्टरही शॉक झाले.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 24 फेब्रुवारी : काही लोक असे असतात जे थोडी जरी दुखापत झाली किंवा काही विचित्र लक्षण दिसली की लगेच डॉक्टरांकडे धाव घेतात. किंवा काही लोकांना त्यांच्यासमोर असं काही दिसतं की यामुळे आपल्याला काहीतरी झालं आहे, असं वाटतं आणि ते डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. गुजरातमधील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एक महिला उपचारासाठी रुग्णालयात गेली. तिने आपल्या बॅगेतून रुग्णालयात असं काही आणलं की ते पाहून डॉक्टरही शॉक झाले. राजकोट शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील हा प्रकार आहे. दुर्गाबने चौहान नावाची महिला या रुग्णालयात आली. तिने तिच्या बॅगेतून काहीतरी आणलं होतं. ते डॉक्टरांना दाखवत तिने आपल्यावर उपचार करायला सांगितलं. हे आपल्याला चावलं आहे, आपल्यावर उपचार करा, असं ती डॉक्टरांना म्हणाली. Shocking! चिकन खाताच व्यक्तीला मारला लकवा; सुदैवाने मरता मरता वाचला ही महिला रात्री आपल्या घरी झोपली होती. सकाळी उठल्यानंतर तिला तिच्या अंथरूणात असं काहीतरी दिसलं जे पाहून ती घाबरली. ते आपल्याला चावलं की नाही याची माहिती तिला नव्हती. ते माहिती करण्यासाठी तिने मीठ खाल्लं, ते तिला गोड लागलं. त्यानंतर मिरची खाल्ली तीसुद्धा तिला गोड लागली. आपल्या चवीत झालेला बदल पाहून महिला घाबरली. तिने लगेच  108 क्रमांकावर फोन केला. अॅम्ब्युलन्स आली आणि तिला रुग्णालयात घेऊन केली.

रुग्णालयात जाण्याआधी महिलेने एक बॅग घेतली आणि त्या बॅगेत काहीतरी पॅक करून नेलं. रुग्णालयात पोहोचताच तिने ते डॉक्टरांना दाखवलं. हा मला रात्री चावला, माझ्यावर उपचार करा. असं ती डॉक्टरांना म्हणाली. 18 पुशअप्स मारून उठला, तोच जमिनीवर कोसळला; तरुण पोलिसाच्या मृत्यूचा LIVE VIDEO महिलेने बॅगेतून चक्क साप आणला होता. जो मृत होता. सापाला पाहून डॉक्टरही हैराण झाले.

त्यानंतर  तात्काळ त्या महिलेवर उपचार सुरू केले. महिला आता एकदम ठिक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या