JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIRAL VIDEO - दररोज ढिगभर मांस खरेदी करायची महिला; घरात दिसलं असं भयानक दृश्य, पाहूनच उडेल थरकाप

VIRAL VIDEO - दररोज ढिगभर मांस खरेदी करायची महिला; घरात दिसलं असं भयानक दृश्य, पाहूनच उडेल थरकाप

मांस खरेदी करून महिला घरी न्यायची, त्यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

क्वालालांपूर, 06 जुलै : चिकन-मटण खायला कुणाला आवडत नाही. पण तरी तुम्हाला ते कुणी खायला दिलं तरी तुम्ही फारफार तर किती खाल. कधीतरी कंटाळालंच ना. पण एक महिला मात्र दररोज मांस खरेदी करायची. ते पण एक-दोन किलो नव्हे तर भरपूर, ढिगभर. आता ती कोणतं हॉटेल किंवा कोणतं खाद्यपदार्थाचं दुकान वगैरे चालवत होती तर तसंही नाही. स्वतःला खाण्यासाठीही ते ती न्यायची नाही. मग ती या मांसाचं करायची काय? याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्वांनाच धक्का बसला. महिला दररोज ढिगभर मांस खरेदी करून घरी न्यायची. त्यासोबत फळंही असायची. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक महिला हातात भलीमोठी भरलेली पिशवी घेऊन येताना दिसते. तिचा नवरा तिच्या हाताती पिशवी घेऊन खाली ठेवतो आणि त्या पिशवीत काय काय आहे ते दाखवतो. त्यात सफरचंद, केळी, संत्री अशी फळं आहेत. सोबतच चिकन आणि मीटही आहे.

त्यानंतर तो एका पिंजऱ्याकडे बोट दाखवतो जथं काही पक्षी दिसत आहेत. पिशवीतील फळं या पक्ष्यांसाठी असल्याचं तो म्हणतो. मग  मांस तो किचनमध्ये घेऊन जातो आणि स्वच्छ धुऊन कापतो. VIRAL VIDEO - सिंहिणीच्या डरकाळीनेच सिंहाला फुटला घाम; छाव्यांची शिकार करायला आला, पण धूम ठोकून पळाला आता तो किचनमधून बाहेर येतो आणि एका बास्केटजवळ जातो. मोठ्या बास्केटमध्ये एक पाल किंवा मगरीसारखा एक प्राणी देतो. व्यक्ती बास्केटच्या होलातून मांस त्या प्राण्याला खाऊ घालतो. त्यानंतर तो एका ठिकाणी साचलेल्या पाण्यात जातो. तिथं एक मासा दिसतो. या माशाच्या दिशेनेही तो मांस टाकतो. सर्वात शेवटी तो अशा ठिकाणी जातो, जे पाहूनच धडकी भरते. तिथं पाण्यात दुसरं तिसरं कुणी नाही तर चक्क खतरनाक मगरी आहेत. एक-दोन-तीन मगरी. दोन पाण्यात आहेत आणि एक बाहेरच बसली आहे. व्यक्ती पाण्यातील मगरींना खायला देतो. त्यानंतर जमिनीवरील मगरीच्या तोंडाजवळही मांस नेतो पण ती काही हलत नाही, मांस खात नाही. VIRAL VIDEO - खेळता खेळता चिमुकल्याने पिटबुलच्या डोक्यात मारली बाटली; पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहूनच भरेल धडकी एकंदर काय तर या कपलने आपल्या घराचं प्रायव्हेट झू केलं आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच ते अडचणीत सापडले. हे कपल मलेशियातील एका हाऊसिंग कॉलनीत राहत असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

@mynewshub ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या