बिबट्या आणि ब्लॅक पँथरची लढाई.
मुंबई, 29 मे : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सामान्यपणे सिंह, वाघ, बिबट्या असे प्राणी इतर प्राण्यां ची शिकार करताना दिसतात. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सारख्या प्रजातीचे दोन शिकारी आमनेसामने आले आहेत. बिबट्या आणि ब्लॅक पँथर यांच्यात लढाईचा थरार पाहायला मिळाला. बिबट्या आणि ब्लॅक पँथरचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता बिबट्या आणि ब्लॅक पँथरचा आमनेसामने आला. बिबट्या झाडावर होता आणि ब्लॅक पँथर खाली. पण बिबट्याला पाहून ब्लॅक पँथरही झाडावर चढला. त्यानंतर दोघांमध्ये थरार पाहायला मिळाला. तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला हे थरारक दृश्य दिसलं आणि ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. VIDEO - जंगलाच्या राजाचा बर्थडे! थेट सिंहाजवळ केक घेऊन गेले तरुण; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं व्हिडीओत पाहू शकता झाडाच्या टोकावर बिबट्या बसला आहे. ब्लॅक पँथर त्याला पाहतो आणि झाडावर चढतो. ब्लॅक पँथरही झाडाच्या उंचावर जातो. दोघंही एकमेकांकडे पाहत गुरगुरतात, डरकाळ्या फोडतात. बिबट्याला तशी पळायला वाटच नाही. ब्लॅक पँथरचीही पुढे जाण्याची हिंमत नाही. थोडा वेळा दोघांमध्ये असं गुरगुरणं सुरू राहतं. अखेर त्यांच्यात फार अशी अटीतटीची लढाई काही होत नाही. ब्लॅक पँथर गुपचूप तिथून माघार घेतो आणि झाडावरून खाली उतरतो. शाब्बास रे पठ्ठ्या! मुलाला तुडवत गेली घोडी, पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक VIDEO @GuptaIfs ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ. दोन शिकारी परिसरात भांडत आहेत, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.