पुणे, 27 मे : प्राण्यांचे आजवर बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. विशेषतः बैलांचे व्हिडीओ ज्यात बैल माणसांवर हल्ला करतानाच दिसतात. पण पुण्यात मात्र बैलांचं वेगळंच रूप पाहायला मिळालं. मार्गात आडव्या आलेल्या मुलाला एक घोडी तुडवत गेली पण याच मुलाला या बैलाने वाचवलं आहे. पुण्यातील बैलगाडा शर्यतीत हे थरारक दृश्य पाहायला मिळालं. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत होती. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. समोरून बैल धावत येत असताना समोर घाटाच्या तोंडावर बरेच लोक उभे होते. बैलांच्या या झुंडीत घोडेही होते. एक घोडी पुढे धावत आली., ज्यावर एक व्यक्ती बसलेली होती. जसे घोडा, बैल आपल्या दिशेने धावत येत असल्याचं दिसलं तसं सर्वजण पळू लागले आणि त्यांच्या मार्गातून बाजूला झाले.
याच धावपळीत एक मुलगा मात्र अडकला, तो घोड्याच्या मार्गातच उभा होता. घोडी थेट धावत आली आणि या मुलाला आपल्या पायाखाली तुडवत गेली. घोड्यावरील मुलगाही तोल जाऊन खाली पडला. आजीसाठी ‘मृत्यू’शी भिडली नात; 10 वर्षांची मुलगी बिबट्यावर ‘वाघिणी’सारखी तुटून पडली घोडीने ज्या मुलाला उडवलं तो जमिनीवर आडवा झाला. त्याच्या शरीराचीही हालचाल होताना दिसत नाही आहे. इतक्या घोड्याच्या मागोमाग काही बैलही धावत आले. इतक्या वेगातही एका बैलाचं लक्ष त्या जमिनीवर पडलेल्या मुलाकडे गेलं आणि कसाबसा आपल्या वेगाला आवर घालत तो बाजूला झाला. ज्याप्रमाणे घोडा वेगाने त्या मुलाला तुडवत गेला त्याच वेगात असलेल्या बैलाने मात्र मुलाला धक्काही लागू दिला नाही. घोड्यानंतर आपल्या पायाखाली चिरडण्यापासून त्या मुलाला वाचवलं. त्याने मुलाच्या अंगावरून उडी घेतली पण त्याच्यावर आपला पाय पडू दिला नाही. रोमान्सनंतर मेट्रोत आता माकडचाळे! ट्रेनमध्ये घुसून माकडाने काय केलं पाहा VIDEO शर्यतीतही भान राखत हुशार बैलाने एका जीवाला काहीच होऊ दिलं नाही. त्याची ही हुशारी कौतुकास्पद आहे.
रस्त्यात आडवा आला मुलगा, घोडीने तुडवलं पण बैलाने वाचवलं; पुण्यातील थरारक घटना.#Pune pic.twitter.com/yW4WaYx8gD
— News18Lokmat (@News18lokmat) May 27, 2023
हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने मुलाचा जीव वाचला आहे. पण घोड्याने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.