प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 25 फेब्रुवारी : तुम्ही कुठेही जा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अनेक भटके कुत्रे दिसतील. हे कुत्रे आपल्या आपल्या भागात फिरत असतात. त्यांना काही प्राणी प्रेमी खायला देतात, त्यावर ते जिवंत राहातात. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडताना तुम्ही ऐकलं असेल. कधी कधी आपण कुत्रे रडतायत असं देखील म्हणतो. पण अनेक लोक कुत्र्याचे रडणे हे अशुभ मानतात. ते असं रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे किंवा कुत्र्यांना भूत दिसतं असा देखील अनेकांचा समज आहे. पण हे खरं नाही. याबाबत एका संशोधनात एक अतिशय मनोरंजक खुलासा झाला आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रत्यावर नग्नवस्थेत फिरतेय रहस्यमय महिला, कॅमेरात कैद झालं नसतं तर विश्वास ठेवणं ही कठीण जुन्या समजुतींमध्ये कारण काय आहे? अनेक वेळा कुत्रे रात्री भुंकताना आढळतात. यादरम्यान ते भुंकत नसून रडत असल्याचे लोक म्हणतात. जुन्या समजुती लक्षात घेऊन, लोक सांगतात की जेव्हा काही वाईट गोष्ट घडणार आहे तेव्हा असे घडते. असे मानले जाते की त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी आत्मा आहे ज्याला सामान्य लोक पाहू शकत नाहीत आणि त्यांना पाहून हे कुत्रे रडू लागतात. जेव्हा कुत्रे असे करतात तेव्हा लोक त्यांना हाकलून लावतात. कुत्र्याच्या भुंकण्यामागचे एक कारण असे मानले जाते की ते रात्रीच्या वेळी काही अप्रिय घटना दर्शवतात. तसेच रात्री किंवा दिवसा जरी कुत्रे रडले तरी त्यांचे रडणे शुभ मानले जात नाही. याशिवाय घरातील पाळीव कुत्रा रडायला लागला किंवा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले किंवा खाणे पिणे बंद झाले तर याचा अर्थ असाही होतो की घरावर संकट येणार आहे. पण यामागे खरं कारण काय? शास्त्रत्रांच्यामते कुत्रे फक्त तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या बाकीच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असतो. या खास आवाजाद्वारे ते अनेक वेळा त्यांचे स्थान त्यांच्या बाकीच्या साथीदारांना सांगतात जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील. दुसरीकडे, कुत्र्यांना वेदना होत असतानाही ते रडतात किंवा ओरडतात. त्यांची समस्या मांडण्याची ही एक खास पद्धत आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडते. त्याला एकटेपणा अजिबात आवडत नाही. जेव्हा ते घरी किंवा बाहेर रस्त्यावर एकटे असतात तेव्हा त्यांना एकटेपणा जाणवतो. यामुळे ते रडतात. कुत्र्याला दुखापत झाली किंवा त्याची तब्येत बरी नसली तरी तो रात्री रडायला लागतो.