सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 11 मे : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की आताच्या नवीन आलेल्या टू व्हिलरमध्ये गाडी सुरु करताच त्याची हेडलाईट देखील चालू होते. पण आधीच्या गाडीत असं नव्हतं. रात्रीच्या वेळी किंवा गरजेच्या वेळी लाईट हवी असेल, तर तुम्ही मॅन्युअली बटण वापरुन ते सुरु करु शकत होतात. पण आता असं होतं नाही. पण असं का? गाड्यांवरील हेडलाईट सुरु ठेवणं केव्हा पासून सुरु करण्यात आलं किंवा का सुरु करण्यात आलं असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 1 एप्रिल 2017 पासून देशातील मोटरसायकलमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन फीचर देण्यात आले. या वैशिष्ट्यामुळे सर्व वाहनांचे हेडलाईट नेहमी चालू ठेवण्यात आले. आता ते बंद किंवा चालू करण्यासाठी कोणतेही स्विच दिलेले नाही. हा नियम केंद्रीय परिवहन मंत्रालयाने 1 एप्रिल 2017 पासून लागू केला आहे. हॉटेलला 3 स्टार, 5 स्टार असं रेटिंग्स का आणि कोण देतं? कधी विचार केलाय? पण आता प्रश्न असा उभा राहातो की का? सरकारनं असा नियम का काढला? रस्ते अपघातात दुचाकी वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय परिवहन मंत्रालयाने ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन (AHO) वैशिष्ट्य सुरू करण्याची शिफारस केली होती. नेहमी चालू असलेल्या हेडलाइटचा मुख्य उद्देश रस्त्यांवरील दुचाकींची दृश्यमानता वाढवणे हा होता. वास्तविक, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये वाहनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी हा नियम अनेक वर्षांपासून लागू आहे. वाहानं दिसत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. पण गाड्यांच्या हेडलाईट सुरु ठेवल्यांने अपघाताचे प्रमाण कमी झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. प्रेमाने माकडाला खायला देत होती तरुणी, पण तिच्यासोबत घडला असा प्रकार की उडाला चेहऱ्याचा रंग सरकार वेळोवेळी दुचाकी वाहनांबाबत नवनवीन नियम आणत असते, भारतातील दुचाकींमध्येही ऑटोमॅटिक हेडलाइट ऑन फीचर देण्यामागचे हे मुख्य कारण आहे. वास्तविक, रस्त्यावर लहान वाहनांची दृश्यमानता कमी आहे. अशा स्थितीत दूरवरून वाहन येत असेल तर त्याचा पत्ता लागत नाही. त्याचबरोबर खराब हवामान किंवा रस्त्यावर धुके असल्याने छोटी वाहने अजिबात दिसत नाहीत. अशा स्थितीत वाहनांची धडक बसण्याची शक्यता वाढते. मात्र, बाईकची हेडलाईट नेहमी चालू राहिल्यास त्याची दृश्यमानता कायम राहते आणि ते दुरूनही दिसू शकते. आजच्या नवनवीन बाईकमध्ये प्रगत बॅटरी तंत्रज्ञान आणि पर्यायांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे भार वाढला तरी बॅटरीवर परिणाम होत नाही. दुसरीकडे, AHO प्रणाली बाईकच्या मायलेजवर परिणाम करत नाही.