मुंबई, 11 मे : सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंनी भरलेले आहे. येथे तुम्हाला इतक्या गोष्टी पाहायला मिळतील की अगदी दिवस भर देखील तुम्ही फोन स्क्रोल करत बसू शकता आणि तुम्हाला जरासाही कंटाळा येणार नाही. तुम्ही हा शेवटचा व्हिडीओ, हा शेवटचा व्हिडीओ करत बसाल पण तुमचं मन भरणार नाही. असाच एक मजेदार व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ एका मुलीशी संबंधित आहे, जी माकडांना खाण्यासाठी देत आहे. ती प्रेमाने माकडांना खाण्यासाठी देत असते, पण ही तिची मोठी चुक ठरते. आम्ही असं का म्हणत आहोत? असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा तुम्हाला सगळं लक्षात येईल. Video : आधी कपात लघवी मग त्यातच ग्राहकाला दिला चहा, दुकानदाराचं संतापजनक कृत्य कॅमेरात कैद काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एक माकड एका जागी आरामात बसलेले दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूला लोक Video बनवत आहेत. तेवढ्यात एक मुलगी त्याच्या जवळ आली. तिच्या हातात काहीतरी खाण्याचा पदार्थ होता. तिने माकडावर दया दाखवत त्याला ते खाण्यासाठी दिले. या तरुणीने मनात विचार केला असाव की हे पाहून माकडाला खूप आनंद होईल, पण तसं काहीच झालं नाही, उलट तरुणीला दुसऱ्या माकडाने येऊन एक कानशिलात लावलं. हे पाहून तुम्हाला नक्की हसू आवरनार नाही, शिवाय आश्चर्य देखील नक्कीच वाटेल की नक्की या माकडाने असं का केलं असावं? ऑनलाईन वाहन चलानमुळे मोडला व्यक्तीचा संसार, नक्की असं काय घडलं? या मजेदार व्हिडीओला अगदी काही वेळात हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.
असं कधी घडेल असा मुलीने स्वप्नातही विचार केला नसेल. एका गोळीच्या वेगाने त्याने मुलीला जोरात चापट मारली की या तरुणीला स्वत:ला वाचवण्याचा देखील वेळ मिळाला नाही. माकडाकडून कानशिलात खाल्यानंतर तरुणीचा चेहरा पाहण्यासारखा होता. माकड आणि मुलीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हे इन्स्टाग्रामवर thejusticmemes नावाच्या हँडलसह शेअर केलं गेलं आहे.