JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्ता ओलांडताना भरधाव गाडीखाली आलं मुल, पुढे झालं असं काही....Shocking Video व्हायरल

रस्ता ओलांडताना भरधाव गाडीखाली आलं मुल, पुढे झालं असं काही....Shocking Video व्हायरल

रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत चाललं आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांनी आणि वाहने चालवणाऱ्यांनी दोघांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

जाहिरात

शॉकिंग व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 21 एप्रिल : रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिंवस वाढत चाललं आहे. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्यांनी आणि वाहने चालवणाऱ्यांनी दोघांनीही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अपघाताच्या अनेक भयानक घटना समोर येत असतात. याचे व्हिडीओदेखील अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. नुकताच लहान मुलाच्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भीषण अपघातांमध्ये अनेकदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो तर काहीवेळा लोक गंभीर जखमी होतात. नुकताच अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये हृदयद्रावक अपघातातून एक लहान मूल चमत्कारिकरित्या वाचलेलं पहायला मिळालं. हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये एक लहान मूल खेळत असताना अचानक रस्ता ओलांडण्यासाठी पळत सुटतो. त्याचवेळी समोरून येणारे भरधाव वाहन त्याच्यावरून जाते. अपघाताचा वेग एवढा आहे की मुलगा यातून वाचणंही कठिण झालं असतं. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातातून चिमुकला बचावला आहे आणि विशेष म्हणजे त्याला कुठलीही इजा झाली नाही.

संबंधित बातम्या

@cctvidiots नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. १० सेकंदांच्या या व्हिडीओने पाहणाऱ्यांना घाम फोडला. अपघातानंतर लगेचच आजूबाजूला उभे असलेले लोक त्याला उचलण्यासाठी धावतात.व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत. व्हिडीओ अनेकवेळा पाहिला जात असून अनेकजणांनी व्हिडीओ लाईकदेखील केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या