प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी अस्तित्वात असतात किंवा घडत असतात, ज्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही किंवा विचार करत नाही. त्यांपैकीच एक आहे ते म्हणजे माणसांचं वागणं. आता जर तुम्हाला एक जनरल नॉलेजचा किंवा एक मजा म्हणून प्रश्न विचारला तर तो तुम्हाला देता येईल? हा प्रश्न फारच साधा आहे, ज्याचा संबंध तुमच्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टींशीच आहे, फक्त तुम्हाला थोडा जास्त विचार करण्याची गरज आहे. आता हा प्रश्न असा आहे की, अशी कोणती कामं/ कोणतं काम आहेत, जे बायका करतात पण पुरूष कधीच करू शकत नाहीत? भारतातील अशा विचित्र परंपरा, ज्याबद्दल जाणून म्हणाल OMG! करा करा… थोडा विचार करा आणि पाहा उत्तर सांगता येतंय का? सामान्य माहितीच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. चला त्यावर एक नजर टाकू १. आपल्या आवडत्या सिने कलाकारांना मिठी मारणे जर महिलांना कोणताही नट आवडत असेल, तर महिला त्याला जाऊन मिठी मारु शकतात किंवा बऱ्याच वेळा महिला त्या अभिनेत्याला आपल्या जवळ ओढताना आणि त्यांना किस करताना दिसल्या आहेत. पण हिच गोष्ट एखादा पुरुष अभिनेत्रीच्या बाबतीत करु शकत नाही. त्याने असं केलं तर त्यावर पोलीस केस देखी होण्याची शक्यता आहे. २. जाहिरपणे छेडछाड करणे महिला पुरुषांसोबत उघडपणे फलर्टींग करु शकतात. तसेच त्यांची मजेदार पद्धतीने छेड देखील काढू शकतात. पण हेच जर त्या पुरुषाने करण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्याचं काही खरं नाही. उदाहरण : क्रिकेटर गेलचा एका पत्रकारा सोबत छेडछाडचा किस्सा बराच प्रसिद्ध आहे. गेलने मुलाखती दरम्यान एक महिला पत्रकाराच्या सौंदर्याची तारीफ करत तिला बाहेर भेटायचं आमंत्रण दिलं. गेलच्या बोलण्यामुळे त्याच्यावर टीका केली गेली, त्याला याचा फाईन भरावा लागला, पण मरीया मात्र छेडछाड करुन नामानिराळी राहिली. ३. घरगुती भांडणात/ वादात जिंकणे बऱ्याच प्रकरणात घरातील वादामध्ये पुरुष मंडळी बायकांसमोर जिंकणं हे अशक्यच आहे. त्यामुळे घरच्या बायकोसोबत किंवा महिला (आई) समोर जिंकणे पुरुषांसाठी अशक्यच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
जर तुमच्या मनात आणखी एखादी गोष्ट असेल किंवा दुसरं काही उत्तर माहित असेल, तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमचे विचार सांगा.