कुत्र्यांना खरंच आत्मा दिसतो?

बऱ्याचदा रात्रीच्या वेळी किंवा पहाटे कुत्रे मोठ्याने ओरडतान/रडताना तुम्ही ऐकलं असेल.

कुत्रे रडतात म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे, असं लोक मानतात आणि त्यांना हाकलून लावतात.

तसेच कुत्र्यांना भूत दिसतं म्हणून ते रडतात, असा देखील अनेकांचा समज आहे.

तसेच रात्री किंवा दिवसा कुत्रे रडले तरी त्यांचे रडणे अशुभ मानले जाते

पाळीव कुत्र्याच्या डोळ्यातून अश्रू आले किंवा खाणं बंद झालं तर घरावर संकट येतं असा ही लोक अर्थ लावतात

पण हे खरं नाही. याबाबत एका संशोधनात मनोरंजक खुलासा झाला आहे. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

शास्त्रज्ञांच्यामते कुत्रे फक्त तेव्हाच रडतात जेव्हा त्यांना त्यांच्या बाकीच्या साथीदारांना एखादा संदेश द्यायचा असतो

याद्वारे ते अनेक वेळा त्यांचे स्थान त्यांच्या साथीदारांना सांगतात जेणेकरून ते त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकतील

दुसरीकडे, कुत्र्यांना वेदना होतात म्हणून ते रडतात किंवा ओरडतात. समस्या मांडण्याची ही एक पद्धत आहे

एका मीडिया रिपोर्टनुसार, कुत्रा हा असा प्राणी आहे ज्याला माणसांमध्ये मिसळायला आवडते

कुत्र्याला एकटेपणा अजिबात आवडत नाही. जेव्हा तो घरी किंवा रस्त्यावर एकटा असतो, तेव्हा देखील तो रडतो