मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं लोक नेहमी म्हणतात. येथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक राहातात. त्यामुळे त्यांच्या चालीरीती आणि परंपरा देखील वेगवेगळ्या आहेत. त्यांपैकी काहींच्या बाबतीत आपल्याला ठूवक आहे. पण तरी ही अशा काही परंपरा भारतात आहेत, ज्यांबद्दल आपल्याला अद्यापही ठावूक नाही. या परंपरा इतक्या विचित्र आहेत की त्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला भारतातील अशाच विचित्र परंपरांबद्दल जाणून घेऊ देवीला लाकूड आणि दुधी भोपळा अर्पण करणे भारतात रतनपूर नावाचे एक ठिकाण आहे. येथे शाटन देवीचे मंदिर आहे, ज्याला लहान मुलांचे मंदिर असेही म्हणतात. प्रत्येक मंदिरात प्रसाद किंवा पूजेसाठी फळे, फुले, नारळ आणि प्रसाद दिला जातो, परंतु शाटन देवीच्या मंदिरात वेगळा नियम आहे. येथे दुधी भोपळा आणि तेंदूचा प्रसाद केला जातो. हे मंदिर विशेषतः लहान मुलांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा? भाविक येथे येतात आणि मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यासाठी दुधी भोपळा आणि तेंदूचं लाकूड अर्पण करतात. अंगावरुन गाय धावत जाण्याची परंपरा उज्जैन हे शहर मध्य प्रदेशातील इंदूरजवळ आहे. इथेही वर्षानुवर्षे एक विचित्र परंपरा पाळली जात आहे. ही परंपरा दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरी करतात. ज्यामध्ये लोक जमिनीवर झोपतात आणि अनेक धावत्या गायी त्यांच्या अंगावरुन जातात. दिवाळीतील एकादशीच्या दिवशी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. यासाठी गायींना सजवून त्यांच्या गळ्यात हार घालण्यात येतो. धावत जाणारी गाय जमिनीवर झोपलेल्या माणसांवरुन धावते. ही खूपच धोकादायक परंपरा आहे, यामध्ये कोणाचाही जीव जाऊ शकतो. पूर्व उत्तर प्रदेशात एक विचित्र परंपरा दिसून येते. यामध्ये गोरखपूर आणि देवरिया जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय बिहारच्या काही भागात ही परंपरा पाळली जाते. यामध्ये परंपरा ताडी टपरीच्या समुदायाशी जोडलेली आहे. या समाजातील लोक ताडी काढण्यासाठी झाडावर चढतात जे अत्यंत धोकादायक आहे. हे काम गच्छवाह समाजाकडून केले जाते आणि या समाजातील महिला ताडी काढण्याच्या चार महिन्यांत सिंदूर लावत नाहीत, तसेच ते आपल्या सौभाग्याची निशाणी काढून देवी समोर ठेवतात. या दरम्यान महिला तारकुल्हा देवीसमोर सौभाग्याचे सर्व चिन्हे काढून ठेवतात. या महिला नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी करतात. भारताती एका भागात एक उंच डोंगर आहे, तसेच त्यावर मोठमोठे दगड देखील आहे. या भागावर चंद्राचा आकार कोरला आहे, म्हणून लोक त्याला चंद्राचा पर्वत असेही म्हणतात. असे म्हटले जाते की चंद्राचा आकार आईच्या पोटात वाढणाऱ्या मुलाबद्दल सांगू शकतो. मुलगा होणार आहे की मुलगी हे पर्वत ते अचूक सांगतं. यासाठी गरोदर महिलेला दगड फेकून पाहावा लागतो. जो चंद्राच्या आत पडला तर तो मुलगा आहे आणि बाहेर आला तर ती मुलगी आहे.
वाराणसीचा एक मठ आहे, जो सर्वात जुना मानला जातो. येथे आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान नाही तर शिवलिंग दान केले जाते. मठात लाखो शिवलिंगे एकत्र असतात.