JOIN US
मराठी बातम्या / Viral / शंख घरी विसरल्याने गुरुजींनी केली ‘ही’ युक्ती; लग्नाचा व्हिडिओ तुफान VIRAL

शंख घरी विसरल्याने गुरुजींनी केली ‘ही’ युक्ती; लग्नाचा व्हिडिओ तुफान VIRAL

गुरुजींनी शंख विसरल्यामुळे भन्नाट युक्ती केली आणि वेळ निभावून नेली. हा व्हिडिओ पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते.

जाहिरात

लग्नाचा व्हिडीओ व्हायरल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 जून : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खूप गंमतशीर असतात. विशेषतः लग्नसोहळ्यांचे काही अजब व हसायला लावणारे व्हिडिओज खूप व्हायरल होतात. अशा व्हिडिओजना व्ह्यूजही अनेक मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. एका लग्ना मध्ये गुरुजींनी शंख विसरल्यामुळे भन्नाट युक्ती केली आणि वेळ निभावून नेली. हा व्हिडिओ पाहिल्यावर हसून हसून पुरेवाट होते. लग्नसोहळ्यातले विधी, गाणी, डान्स यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. नवरा-नवरीच्या व्हिडिओजना खूप पसंतीही मिळते. काही नवरे विचित्र डान्स करतात, तर एखादी नवरी स्टेजवर बंदूक चालवते. असे किस्से खूप व्हायरल होतात; मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ नवरा-नवरीचा नसून लग्नातल्या गुरुजींचा आहे. या गुरुजींनी जे केलं ते पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. Wedding Video: वधूला सोडून सासूसोबत डान्स करायला लागला वर, Video तुफान व्हायरल या व्हिडिओत लग्नमंडपात अनेक पाहुणे बसलेले दिसताहेत. सगळे पाहुणे गुरुजींकडे पाहताना हसत आहेत. व्हिडिओमध्ये शंख वाजल्यासारखा आवाज येतो; मात्र हा आवाज शंखाचा नसून गुरुजी तोंडानेच तो काढत आहेत, हे नंतर कळतं. ते पाहून तिथे बसलेले सगळे पाहुणे हसत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. गुरुजी शंख घरीच विसरून आले व त्यामुळे त्यांनी तोंडानेच शंखाचा आवाज काढला, असं व्हिडिओवर लिहिलेल्या ओळींमधून स्पष्ट होतंय. इन्स्टाग्रामवर captured_by_minks या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत व्हिडिओला 5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच 3 लाखांहून जास्त लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत. मल्टिटॅलेंटेड गुरुजींचं कौशल्य पाहून अनेकांना हसू आवरता आलेलं नाही. Weird Tradition : एक विवाह ऐसा भी! भारतातील या ठिकाणी नवरदेवाला नवरीची आई लग्नात पाजते दारू लग्नासारख्या मोठ्या सोहळ्यात एखादी वस्तू विसरतेच किंवा हरवतेही; पण या व्हिडिओत गुरुजींनी शंख विसरल्याने वेळ निभावून नेण्यासाठी केलेली युक्ती भन्नाट आहे. शंखासारखा आवाज काढून त्यांनी शंख वाजवल्यासारखी अनुभूती दिली. त्यांची ही युक्ती पाहून तिथे उपस्थित सर्वांना हसू आवरता आलं नाही. त्याचबरोबर व्हिडिओ पाहणाऱ्यांनाही हसू आलं नाही तर नवल!

संबंधित बातम्या

लग्नाच्या सीझनमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. हलके-फुलके व्हिडिओ खूप लोकप्रिय होतात. काही वेळा व्हायरल होण्यासाठी ठरवून व्हिडिओ केलेले असतात; मात्र काही वेळेला प्रत्यक्षात घडणाऱ्या गमती-जमती व्हिडिओजना लोकप्रिय करतात. याच प्रकारातला हा व्हिडिओ आहे. गुरुजींची एक छोटीशी युक्ती व्हिडिओ तुफान व्हायरल करण्यासाठी पुरेशी ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या