जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Wedding Video: वधूला सोडून सासूसोबत डान्स करायला लागला वर, Video तुफान व्हायरल

Wedding Video: वधूला सोडून सासूसोबत डान्स करायला लागला वर, Video तुफान व्हायरल

लग्नातील डान्स व्हिडीओ

लग्नातील डान्स व्हिडीओ

सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जून : सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. लग्नातील वधू वर आणि सासूचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नातील वरमाला विधी झाल्यानंतर वधू वर स्टेजवर उभे असलेले दिसत आहे. गाणं वाजताच वर बेभान होऊन मनसोक्त नाचू लागतो. वधूही त्याला नाचण्यात साथ देते. दोघेही नाचत असताना वधूची आई वर स्टेजवर येते. ती स्वतःला गाण्याच्या तालावर नाचण्यापासून थांबवू शकली नाही. वरही वधूला सोडून सासूसोबत नाचू लागतो. हा व्हिडीओ काही वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

News18लोकमत
News18लोकमत

@bridal_lehenga_designn नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंटही येत आहेत. सासू सोबत नाचल्यामुळे नेटकरी वराची मजा घेत आहेत.

जाहिरात

दरम्यान, सोशल मीडियावर असे लग्नातील व्हिडीओ व्हायरल होतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतात. लग्नातील असे मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर नेहमीच ट्रेंडिंग असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात