तसं लग्नात नवरदेवाला त्याच्या मित्रांनी मजा म्हणून गुपचूप दारू पाजल्याचे काही व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. परदेशातही दारू पिऊन लग्नाचं सेलिब्रेशन केलेलं पाहिलं असेल. पण भारतातील लग्नात मात्र असं नाही.
पण तुम्हाला माहिती आहे का खरंतर भारतातही एका ठिकाणी लग्नाची अशी प्रथा आहे. जिथं नवरदेवाला लग्नातच दारू पाजली जाते. आश्चर्य म्हणजे नवरदेवाची आई, नवरीची आई आणि नवरीसुद्धा नवरदेवाला दारू पाजते. त्यानंतर लग्नाच्या पुढील विधीला सुरुवात होते.
त्यानंतर वधू-वरांचे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून दारू पितात. त्याचवेळी वधूही वराला दारू देते. त्यानंतर लग्नाचे सर्व विधी होतात.
आता कित्येक पुरुषांना हवीहवीशी वाटणारी ही प्रथा आहे, तरी कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ही प्रथा आहे छत्तीसगढच्या कावर्धा जिल्ह्यातील बैगा आदिवासी समाजातील. (सर्व फोटो प्रतीकात्मक)