चालतं आंब्याचं झाड
भरतसिंह वढेर/अहमदाबाद, 12 एप्रिल : उन्हाळा म्हटलं की आंबा आलाच. आंब्याची तुम्ही बरीच झाडं पाहिली असतील. आंब्याच्या झाडाचे आंबे काढून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. पण तुम्ही कधी आंब्याचं चालणारं झाड पाहिलं आहे का? असं आंब्याचं झाड भारतातच आहे. भारतातील गावात असं अनोखं झाड आहे. झाडं सजीव असतात. त्यांना अन्न-पाणी-ऑक्सिजन लागतं. पण तरी झाडं इतर जीवांप्रमाणे बोलू शकत नाहीत, आवाज काढू शकत नाहीत किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकत नाही. ते एकाच जागी स्थिर असतात. त्यामुळे चालणारं झाडं असं कुणीही सांगितलं तर सहजासहजी विश्वास बसणार नाही. त्यामुळे देशातील असंच एक आंब्याचं झाड सर्वांसाठी आश्चर्य बनलं आहे.
देशभरातील पर्यटकांना हे झाड आकर्षित करतं. हे झाड खूप प्रसिद्ध आहे. स्थानिकांच्या मते, हे झाड पूर्वेकडे सरकत आहे. गेल्या दोन शतकांमध्ये त्याच्या मूळ स्थानापासून सुमारे 200 मीटर अंतरावर गेल्याचं सांगितलं जातं आहे. अजूनही हे झाड आपल्या जागेवरून हलतं आहे. काय सांगता! एकाच झाडावर 300 प्रकारचे आंबे; भारतातच आहे हे झाड, पण कुठे ते माहितीये का? हे झाड हजारो वर्षे जुनं असल्याचं सांगितलं जातं. या झाडाला इथलं लोक पवित्र मानतात. त्याची पूजाही करतात. 1300 वर्षांपूर्वी पारशी वसाहतींनी या झाडाची लागवड केली, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
आता हे झाड आहे कुठे तर गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगाम तालुक्यातील संजन गावात हे झाड आहे. वली अहमद अच्छू यांच्या संजन मळ्यात आंब्याचं झाड आहे.