JOIN US
मराठी बातम्या / Viral / कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO

कारच बोनेट उघडताच दिसला 10 फूटांची अजगर, पुढे काय झालं पाहा VIDEO

बोनेटच्या आतामध्ये 10 फूट लांबीचा अजगर वेटोळे करून बसला होता. त्याला बोनेटमधून काढणं जास्त कठीण होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : साप किंवा अजगर म्हटलं की बोबडी वळते. हा अजगर कधी गाडीच्या चाकात तर कधी दुचाकीला वेटोळं करून बसल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता थेट अजगर कारच्या बोनेटच्या आता शिरल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील फ्लोरिडामधील डेनिया बीचचा आहे. निळ्या फोर्ड कारच्या बोनटच्या आत 10 फूट लांबीचा अजगर इंजिनच्यावर वेटोळं करून बसला आहे. ही गाडी पार्किंगमध्ये उभी असताना हा प्रकार घडला. दरम्यान, जेव्हा त्याचा मालक तेथे आला आणि कार सुरू करण्यात तेवढ्यात त्याला इंजिनमध्ये गडबड वाटली. त्याने बोनेट उघडून पाहिलं तर त्याला धक्का बसला.

हे वाचा- 3 मिनिटांपेक्षाही कमी वेळात कारचं होतं विमान, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO बोनेटच्या आतामध्ये 10 फूट लांबीचा अजगर वेटोळे करून बसला होता. त्याला बोनेटमधून काढणं जास्त कठीण होतं. त्यानं वन्यजीव कर्मचाऱ्यांना याची माहिती कळवली. वन्यजीव कर्मचाऱ्यांनी या अजगराला पकडून काढण्याचा प्रयत्न केला. या अजगरानं वेटोळं घालून त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अजगर हल्ल्याच्या तयारीत होता पण तेवढ्या वन्यजीव अधिकाऱ्यानं त्याला पकडलं आणि बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या