JOIN US
मराठी बातम्या / Viral / Video Viral : तरुणांनी मिळून दुकानदाराला असं फसवलं, पाहून नेटकरीही करु लागले कौतुक

Video Viral : तरुणांनी मिळून दुकानदाराला असं फसवलं, पाहून नेटकरीही करु लागले कौतुक

हा एक प्रँक व्हिडीओ आहे. जो काही तरुणांनी मिळून एका दुकानदारासोबत केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटेल.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : सोशल मीडियावर नेहमीच मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे कधी एखाद्या क्षणांचे असतात, तर कधी ते ठरवून बनवले जातात. यांपैकी काही व्हिडीओ लोकांना इतके आवडतात की ते व्हिडीओ रोतोरात ट्रेंड होऊ लागतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी आपलं हसू रोखू शकत नाही. हा एक प्रँक व्हिडीओ आहे. जो काही तरुणांनी मिळून एका दुकानदारासोबत केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हच्या चेहऱ्यावर देखील हसू उमटेल. Video Viral : वळणाच्या रस्त्यावर बाईक चालकाचा स्टंट, समोरुन कार आली आणि भयंकर घडलं प्रँक व्हिडीओ बनवणारे लोक अनेकदा इतरांना मूर्ख बनवतात आणि त्यांची चेष्टा करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक खूप गोंधळून जातात आणि त्यांच्या जाळ्यात अडकून फसवणूक होते. असंच या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळालं. हा मजेदार प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लाइक आणि शेअर केला जात आहे. या व्हिडीओत आधी एक तरुण येतो आणि पायात काहीतरी अडखळल्या सारखं करतो, पहिलं तर हे पाहून दुकानदार आश्चर्यचकीत होतो, पण याकडे फारसं लक्ष देत नाही. पण जेव्हा दुसरा तरुण देखील अडखळल्यासारखं करतो तेव्हा दुकानदात एकदा तपास करतो की तेथे काही आहे का, पण त्याला काहीच दिसत नाही. शेकडोंच्या गर्दीत चोराची हुशारी, अशी पळवली बाईक Video पाहून पोलीस देखील हैरान अखेर पुन्हा तिसरा आणि चौथा तरुण देखील पडण्याचं नाटक करतो आणि तेव्हा मात्र या दुकानदाराचा संयम तुटतो. तो आत दुकानात जातो आणि खुर्ची आणून त्या भागात फिरवून पाहातो की तेथे खरंच काही आहे का. हा व्हिडीओ इथेच थांबतो, पुढे काय घडलं हे काही कळू शकलेलं नाही.

संबंधित बातम्या

तसे पहाता काही प्रँक व्हिडीओ हे कोणाचेही नुकसान न करता फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी बनवले जातात, परंतु काही वेळा असे देखील घडते की प्रँक व्हिडीओ पाहून काही लोक भडकतात. पण या व्हिडीओवर लोकांनी भरभरुन मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या