जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video Viral : वळणाच्या रस्त्यावर बाईक चालकाचा स्टंट, समोरुन कार आली आणि भयंकर घडलं

Video Viral : वळणाच्या रस्त्यावर बाईक चालकाचा स्टंट, समोरुन कार आली आणि भयंकर घडलं

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

स्टंट करताना बाईक चालकाने हेल्मेट आणि इतर सेफ्टी किट घातले होते. पण तो वळणा-वळणाच्या रस्त्यावर वेगाने गाडी चालवत होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 मे : सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही थरारक स्टंटचे व्हिडीओ पाहिले असतील. काही लोक प्रसिद्धीसाठी किंवा काही व्ह्यूजसाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. मग ते यासाठी आपल्या प्राणाची देखील पर्वा करत नाही. स्टंटमुळे अनेकांनी आपले प्राण घालवल्याचे तुम्ही पाहिले असेल. तर काही लोक गंभीर जखमी होतात, ज्याची शिक्षा त्यांना आयुष्यभर भोगावी लागते. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या पायाखालची देखील जमीन सरकेल. Viral Video : मनोरंजनासाठी काढत असलेल्या Reels मध्ये कैद झाला तरुणाचा मृत्यू तुम्ही अनेकदा तरुणांना पाहिलं असेल की, ते रस्त्याने गाडी चालवताना किंवा काहीही करताना छोटे व्हिडीओ काढतात, ज्याला आपण रिल्स देखील म्हणतो. असाच व्हिडीओ काढण्यासाठी एका बाईक चालकाने स्टंट केला. स्टंट करताना बाईक चालकाने हेल्मेट आणि इतर सेफ्टी किट घातले होते. पण तो वळणा-वळणाच्या रस्त्यावर वेगाने गाडी चालवत होता. शिवाय त्याने त्याच्या बाईकला जवळ-जवळ झोपवलंच होतं. तितक्यात त्याने समोर पाहिलं की एक कार रस्त्यावरुन यू-टर्न घेत आहे. यासगळ्यातच जजमेंट न आल्याने आणि गाडी हॅन्डल न झाल्याने तरुण थेट समोरील गाडीला धडकला. ज्यामुळे तो गाडीवरुन खाली देखील पडला. Viral : बैलापासून स्वत:ला वाचवण्यासाठी खांबावर चढली व्यक्ती आणि… धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद हा सगळा प्रकार या तरुणाच्या मागे असलेल्या एका बाईकस्वाराच्या कॅमेरात तसेच अपघात झालेल्या चालकाच्या हेल्मेटमधील कॅमेरात कैद झाला. जो नंतर सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. नशिबाने समोरुन दुसरी गाडी आली नाही, नाहीतर किती अनर्थ घडला असता, हे काही वेगळं सांगायला नको.

जाहिरात

हा स्टंट व्हिडिओ ‘थेसिरमौरी’ नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाखो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, “ही चूक बाईक चालकाची आहे, जो इतक्या वेगाने मोटरसायकल चालवत होता. आणखी एका युजरने लिहिले, “दोन्ही ड्रायव्हर्सना वळणदार रस्त्यावर पाहून वाहन वळवायला हवे होते, दोघांचीही चूक आहे…” दुसर्‍याने लिहिले, “सुदैवाने दुचाकीस्वार बचावला.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात