व्हायरल व्हिडीओ
मुंबई, 23 फेब्रुवारी : नवरा बायकोची तुम्ही भांडणं बऱ्याचदा पाहिली असतील, ही भांडणं कधीकधी खूप रौद्र रुप धारण करतात. तर काही भांडणं ही अक्षरक्षा घटस्फोटापर्यंत पोहोचतात. पण नवरा बायकोच्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जे पाहून तुम्ही म्हणाल की असं भांडणं तर कधी पाहिलंच नव्हतं. हा भांडणाचा इतका भयानक व्हिडीओ आहे की पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. भांडताना नवरा-बायकोचं भांडण इतकं टोकाला गेलं की ते दोघेही खिडकीतून खालीच पडले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, भांडता भांडता नवरा-बायको खिडकी जवळ आले आणि त्यानंतर तोल जाऊन दोघे ही खाली पडले. लग्नाच्या चार दिवसात नववधूचा असा कांड, पाहून नवरदेवाच्या पायाखालची सरकली जमीन वास्तविक, हा व्हिडिओ नुकताच एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ रशियातील सेंट पीटर बर्ग येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा व्हिडीओ जुना आहे आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे असं सांगितलं जात आहे. पण हा व्हिडीओ खरोखरंच अतिशय धोकादायक व्हिडीओ आहे. आधी बाल्कनीत एक जोडपं जोरदार भांडत असल्याचे दिसत आहे. तेव्हाच त्यांचा तोल जातो, ज्यानंतर बाल्कनीची रेलिंग तुटून दोघेही रेलिंगवरून खाली पडले. इतकंच नाही तर दोघेही इतक्या वेगाने खाली पडतात की मोठा आवाज येतो. दोघेही खाली पडल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत. तर खाली पार्किंगमध्ये उभी असलेली कार जोरजोरात वाजत आहे.
पुढे या दोघांचं काय झालं हे कळू शकलेलं नाही, पण ज्या पद्धतीने हे दोघेही पडले, त्याप्रमाणे तुम्ही विचार करु शकता की त्यांच्यासोबत किती मोठा अपघात घडला असावा.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याकडे धडा म्हणून पाहत आहेत, तर काही लोक यावर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला पती-पत्नीला तातडीने मदत करायला हवी होती, असा सल्लाही देत आहेत.