">
सोन्याचे पैंजण का घालत नाहीत महिला?
सोनं सौंदर्य वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. त्याचे आयुर्वेदात देखील अनेक फायदे सांगितले गेले आहेत.
सोन्याचे दागिने म्हणून लोक अंगठी, कडे, गळ्यातलं, मंगळसूत्र, कानातले सारख्या गोष्टी बनवतात.
पण सोन्याचे पैंजण मात्र कमी प्रमाणात घातले जातात. असं का?
चांदीचेच पैंजण लोक घालताना दिसतात. पण मग सोन्याचे पैंजण का घातले जात नाहीत?
याचा संबंध ज्योतीशशास्त्राशी असल्याचं सांगितलं जातं. असे मानले जाते की सोन्याचे दागिने तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात.
हिंदू धर्मग्रंथानुसार सोन्याला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्याला कमरेच्या वरतीच घातले जाते.
आता यामागचं वैज्ञानिक कारण काय? जाणून घेऊ
सोन्याचे दागिने पायात उष्णता वाढवतात. कमरेच्या वर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.
शरीराच्या सर्व भागात फक्त सोन्याचे दागिने घातल्यास शरीराचे तापमान वाढल्याने अनेक आजार होऊ शकतात.
पायात चांदीच्या धातूपासून बनविलेले अँकलेट किंवा पैंजण घातल्याने शरीराचे तापमान संतुलित राहाते. चांदीचा धातू शरीराला थंड ठेवतो.
तसेच शरीरात चांदी धारण केल्याने चंद्राची स्थिती चांगली राहून शरीराला ऊर्जा मिळते.
कमरेपर्यंत सोन्याचे आणि पायात चांदीचे दागिने धारण केल्याने शरीरात ऊर्जा प्रवाहित होते आणि अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.