जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नाच्या चार दिवसात नववधूचा असा कांड, पाहून नवरदेवाच्या पायाखालची सरकली जमीन

लग्नाच्या चार दिवसात नववधूचा असा कांड, पाहून नवरदेवाच्या पायाखालची सरकली जमीन

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नववधूने नवरदेवाच्या नकळत मोठा कांड केला आणि जेव्हा हा कांड त्याच्या लक्षात आला तेव्हा फारच उशीर झाला होता. इतकंच काय तर पोलिसांना देखील या प्रकरणाबद्दल ऐकून आश्चर्य वाटले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : लग्नानंतर प्रत्येक नववधू आणि नवरदेव सुखी संसाराचं स्वप्न पाहातात. संसार, कुटुंब, मुल आणि मनासारखा जोडीदार एवढीच त्यांची इच्छा असते. पण यासगळ्यावर एका नववधूनं पाणी फेरलं आहे. एका नववधूने नवरदेवाच्या नकळत मोठा कांड केला आणि जेव्हा हा कांड त्याच्या लक्षात आला तेव्हा फारच उशीर झाला होता. इतकंच काय तर पोलिसांना देखील या प्रकरणाबद्दल ऐकून आश्चर्य वाटले आहे. हे प्रकरण हरियाणातील अंबाला येथील आहे. येथे लग्नाच्या चौथ्या दिवशी नवविवाहित वधू प्रियकरासोबत पळून गेली. ती नुसतीच पळून गेली नाही तर तिने रीतसर प्लान देखील आखला. नववधूने आपल्याकडील लाखो रुपयांचे दागिने आणि 85 हजारांची रोकड पळवून नेली. हे ही पाहा : हनिमून साजरा करताच नवरदेव गायब, नववधूला जेव्हा कळलं तेव्हा… 15 फेब्रुवारी रोजी वधूचे लग्न पंजाबमधील राजापूर गावात राहणाऱ्या तरुणाशी झाले होते. पण चार दिवसातच तिने तिचा खरा चेहरा सर्वांसमोर आला. आता नवरदेवाने महेश नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून नववधूवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने आरोप केला आहे की या नववधूने माझं आयुष्य उद्धवस्त केलं शिवाय पैसे आणि दागिने देखील पळवले. रविवारी, 19 फेब्रुवारी रोजी कारमधून नवरदेवाच्या घरी नववधू आणि नवरदेव परतत असताना, नववधूने वाटेत कार थांबवली आणि तिला पैसे देण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जावे लागेल, असे सांगितले. हे ही पाहा : हे ही पाहा : आधी एकमेकांना Kiss आणि मग कपडे काढत… ट्रेनमध्ये कपलचं अश्लील कृत्य कॅमेरात कैद तरुणाने सांगितले की, बायको जेव्हा कार मधून उतरली तेव्हा, लांब तरुण आधीच दुचाकीवर उभा होता. त्यानंतर ही नववधू त्या तरुणासोबत दुचाकीवर बसून पळून गेली. जे पाहून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोळ्या देखत नववधूने मोठा कांड केला आणि तो काहीच करु शकला नाही. पत्नीने घरातील सर्व दागिने आणि ८५ हजार रुपये घेऊन गेल्याचे वराने सांगितले. या दागिन्यांमध्ये कानातले, बिंदी, नेकलेस, नथ, अंगठी, पैंजण असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महेश नगर पोलिस ठाण्यात नववधू पळून गेल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात