JOIN US
मराठी बातम्या / Viral / श्वेता तेरा Mic ऑन है! सहकाऱ्यांनी सांगूनही ZOOM कॉलवर बरळणारी श्वेता कोण आहे?

श्वेता तेरा Mic ऑन है! सहकाऱ्यांनी सांगूनही ZOOM कॉलवर बरळणारी श्वेता कोण आहे?

ऑनलाईन क्लास दरम्यान श्वेता नावाच्या मुलीचा माईक म्यूट करण्याऐवजी सुरू राहिला होता. त्यानंतर, याच गोष्टीमुळे श्वेता (Shweta) ट्वीटरवर ट्रेंड (Twitter Trend) झाली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 फेब्रुवारी : कोरोना काळात लोकांच्या जीवनशैलीत बर्‍याच बदलल्या. ऑनलाईन मीटिंग ही यापैकी एक आहे. आता कार्यालय, शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत सर्वच ऑनलाईन मीटिंग (Online Meeting) घेताना दिसतात. मात्र, या मीटिंगमध्ये बर्‍याच वेळा अशा घटनाही घडत आहेत, ज्या कोरोनापूर्वी क्वचितच घडल्या असाव्या. नुकतीच अशीच एक घटना घडली आहे, ज्यात ऑनलाईन क्लास दरम्यान श्वेता नावाच्या मुलीचा माईक म्यूट करण्याऐवजी सुरू राहिला होता. त्यानंतर, याच गोष्टीमुळे श्वेता (Shweta) ट्वीटरवर ट्रेंड (Twitter Trend) झाली. झालं असं, की झूम मीटिंगच्या वेळी श्वेता नावाची एक मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत होती. ती आपल्या एका दुसऱ्या मैत्रीणीच्या अफेअरबद्दल बोलत होती. सोबतच ती हेदेखील सांगत होती, की त्यानं हे सीक्रेट फक्त माझ्यासोबत शेअर केलं आहे. श्वेतानं हे सीक्रेट आपल्या मैत्रिणीला सांगताना चुकून माईक सुरू ठेवला आणि हे सीक्रेट ऑनलाईन क्लाससाठी हजर असणाऱ्या 111 लोकांनी ऐकलं.

यादरम्यान अनेक जणांनी श्वेता माईक बंद कर, असंही सांगितलं. मात्र, किस्सा सांगण्यात मग्न असणाऱ्या श्वेताचं याकडे लक्षच गेलं नाही. श्वेताचं हेच संभाषण क्लासमधील कोणीतरी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केलं. यानंतर गुरूवारी श्वेता ट्वीटरवर टॉप ट्रैंडिंगमध्ये आली आणि अनेक तास तिचं नाव ट्रेंडिग राहिलं. यानंतर श्वेतावर भयंकर मीम्स बनू लागले. सोबतच श्वेताच्या त्या मैत्रिणीवरही विनोद होऊ लागले, जिनं हे सीक्रेट कोणालाही शेअर न करण्यास सांगितलं होतं. स्वतः श्वेतानं फोनवर बोलताना असं म्हटलं होतं, की तिनं ही गोष्ट स्वतःच्या बेस्ट फ्रेंडलाही सांगितली नाही. मात्र, मला सांगितली.

आता श्वेताच्या मैत्रिणीचं हे सीक्रेट ट्वीटरच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचलं आहे. काही मिनीटांच्या झूम मीटिंगनं श्वेताला ट्रेंड केलं आहे. सोशल मीडियावर श्वेताच्या नावानं मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. श्वेताचं नाव केवळ मीम्स आणि विनोदामुळे ट्रेंडिग नाही. तर काही लोक असेही आहेत, जे श्वेतासाठी #JusticeForShweta असेही ट्वीट करत आहेत. या घटनेनंतर शेकडो भारतीयांनी गुगल प्लेवर या अॅपला 1 स्टार देत राग व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या