JOIN US
मराठी बातम्या / Viral / त्याच झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा आणि..., बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक VIDEO VIRAL

त्याच झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा आणि..., बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक VIDEO VIRAL

हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे कारण ही व्यक्ती साधासुध्या झाडावर बसून त्याचा शेंडा कापत नाही आहे, तर आकाशाला भिडलेल्या पाम झाडावर (Palm Tree) वर बसून त्याचा शेंडा कापत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर : सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही विचित्र असतात तर काही काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे जो पाहून कदाचित तुम्हाला धडकी भरेल. एक व्यक्ती झाडावर बसून झाडाचा शेंडा कापत असल्याचा व्हिडीओ आहे. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय एवढं? आपल्याकडे असं कितीतरी वेळा दिसून येतं. पण हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे कारण ही व्यक्ती साधासुध्या झाडावर बसून त्याचा शेंडा कापत नाही आहे, तर पाम ट्रीवर (Palm Tree) वर बसून त्याचा शेंडा कापत आहे आणि ते देखील आकाशाला भिडलेल्या एका पाम ट्रीचा. कोकण किनारपट्टीला सर्रास दिसणाऱ्या नारळ-सुपारींच्या झाडांपेक्षाही पाम ट्री जास्त उंच असते. त्यामुळे त्याचा शेंडा कापणं अधिक अवघड. या व्हिडीओमधील इसम चक्क या उंच झाडावर बसून त्याचा शेंडा कापत आहे. आणि शेंडा तुटून खाली पडल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या झाडावर हा इसम अडकून राहिला. ते झाड खूपच उंच असल्यामुळे कापताना ते एका बाजूला वाकले होते. पण कापून पूर्ण झाल्यानंतर शेंडा एका बाजुला फेकला गेला आणि उर्वरित झाड वेगळे झाले. एका क्षणासाठी वाटतं की तो माणूस देखील त्यामुळे दुसरीकडे फेकला जाईल की काय. पण तो तसाच त्या झाडावर हेलकावे खात बसला आहे.

दरम्यान या व्हिडीओवर करण्यात आलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहे. सोशल मीडिया युजर हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही हे भीतीदायक असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. अशाप्रकारे पाम ट्री कापले जात नाहीत असा सल्लाही अनेकांनी दिला आहे. तर काहींनी म्हटले आहे की अचानक मला माझा जॉब खूप चांगला आहे असे वाटू लागले आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ज्यांनी शूट केला आहे ते देखील शॉकमध्ये असल्याचं कळतय. 6 मिलियनपेक्षाही अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर या व्हिडीओच्या लाइक आणि रिट्वीटची संख्या वाढतच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या