JOIN US
मराठी बातम्या / Viral / अकेले है तो या गम है! सिंगल असलेल्यांना तरुणीची Valentine Day साठी भन्नाट ऑफर

अकेले है तो या गम है! सिंगल असलेल्यांना तरुणीची Valentine Day साठी भन्नाट ऑफर

सिंगल लोकांना ऑफऱ देणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 फेब्रुवारी :  व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. लव्हबर्ड्स एकमेकांसोबत ‘लव्ह वीक’ साजरा करत आहेत. तर सिंगल सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स शेअर करून हा आठवडा साजरा करत आहेत. पण आता अशाच सिंगल असलेल्यांसाठी एका तरुणीने भन्नाट ऑफर आणली आहे. ज्यामुळे सिंगल लोकांचाही व्हॅलेंटाईन डे अगदी उत्साहात जाईल. सिंगल लोकांना ऑफऱ देणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी रस्त्याच्या कडेला दिसते आहे. एका गाडीवर ती पाणीपुरी विकते आहे. ही तरुणी बी-टेक झालेली आहे. बी-टेक पाणीपुरीवाली म्हणूनच तिला ओळखलं जातं. व्हिडीओत तुम्ही एका तरुणाचा आवाज ऐकला तर तोसुद्धा हेच सांगताना दिसतो. तो त्या तरुणीजवळ जातो आणि तिला 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेसाठी काही ऑफऱ आहे का विचारतो.  मी सिंगल आहे मला तुम्ही काय ऑफर द्याल, असं तो विचारतो. हे वाचा -  अरुणसाठी वेडी झाली कतरिना! कोरोना काळात मैत्री, नंतर प्रेम आणि आता लग्न; पाहा PHOTO सुरुवातीला तरुणी गोंधळते. पण नंतर बोलता बोलातच ती सिंगल मुलांसाठी भन्नाट ऑफर काढते. तुम्ही पाणीपुरीची एक प्लेट घेतली तर तुम्हाला आणखी एक पाणीपुरी प्लेट फ्री. असं ती सांगते. म्हणजे एका प्लेटच्या पैशात तुम्ही दोन प्लेट पाणीपुरी खाऊ शकता. त्यावर तरुण तिला एका प्लेटमध्ये किती पाणीपुरी असतील? तरुणी त्याला सांगते सहा. त्यानंतर तो ही ऑफर फक्त माझ्यासाठी आहे का?, असंही विचारतो. यावर तरुणी म्हणून ही ऑफर सर्व सिंगल असलेल्यांसाठी आहे.

संबंधित बातम्या

शेवटी तरुण तिला विचारतो जर मी माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीला आणलं तर तर ती मुलगी म्हणते तुम्ही तुमची फ्री प्लेट तिला देऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या