या लग्नात 'हम दिल दे चुके सनम'हून मोठा ट्विस्ट आहे.
मंगला तिवारी, प्रतिनिधी मिर्झापूर, 30 जून : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा आहे. हे लग्न म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ आहे असं लोक म्हणताहेत. परंतु हम दिल दे चुके सनममध्ये ऐश्वर्याचं सलमान खानसोबत लग्नाआधी प्रेम असतं, म्हणून अजय देवगण तिचं त्याच्याशी लग्न लावून द्यायला तयार होतो. परंतु मिर्झापूरमध्ये पार पडलेल्या या लग्नात याहून मोठा ट्विस्ट आहे. सर्वसामान्य लोक असंही करू शकतात? असा प्रश्नच पडेल तुम्हाला ही बातमी वाचून. तर…वाचकांनो, प्रकरण आहे संतनगर भागातलं. येथील एका तरुणाचं लग्न गेल्या वर्षी हलिया भागातील गुलाबीशी झालं. हा विवाहसोहळा अगदी विधिवत पार पडला होता. परंतु गुलाबीच ती, लग्नानंतर तिच्या मनातले गुलाब काही कोमेजले नाहीत. नवऱ्यासोबत वर्षभर उत्तम संसार झाला. लवकरच दोघं गुड न्यूज देणार, अशा आशेवर नातेवाईकमंडळी होती. परंतु कोणालाच हे माहिती नव्हतं की, गुलाबीच्या ओठावर एक आणि हृदयात दुसरंच होतं.
गुलाबी लग्नानंतर सगळ्यांसोबत छान राहायची. ती इतकी गोड वागायची की शेजारी राहणाऱ्या तरुणाचाही तिच्यावर जीव जडला. दोघं तास-तासभर गप्पा मारू लागले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि साहजिकच नवरा कामावर जायचा मग हळूहळू ती प्रेमात बदलली. गुलाबी संसार आणि प्रेम दोन्ही व्यवस्थित सांभाळत होती. परंतु इश्क छुपाए छुपता थोडी है? त्यांच्या प्रेमाची बातमी अख्ख्या गावात पसरली. कोणीतरी याबाबत तिच्या नवऱ्यालाही सांगितलं. मग नवऱ्याने उलटसुलट चर्चांमध्ये न पडता याबाबत थेट बायकोलाच जाऊन विचारलं. पाकचा खतरनाक प्लॅन उघड, 14 सुंदर मुलींची यादी समोर; पोलिसांकडून अलर्ट जारी बायकोजवळ शेजारच्या मुलाचा विषय काढताच, तिने मला त्याच्याशी लग्न करायचंय…आणि त्याच्याशीचं लग्न करायचंय असं ठामपणे सांगितलं. मग नवऱ्यानेही जास्त खोलात न जाता थेट गावकऱ्यांची बैठक बोलावली. गुलाबी आणि तिच्या प्रियकराने सर्व गावकऱ्यांसमोर आपलं नातं कबूल केलं. त्यानंतर मनावर दगड ठेवून नवऱ्यानेही या नात्याला मान्यता दिली आणि गावकऱ्यांकडे त्यांचं लग्न लावून देण्याची मागणी केली. अखेर गावातील मंदिरात हे लग्न पार पडलं आणि गुलाबी तिच्या नव्या सासरी म्हणजेच राहुलच्या घरी राहायला गेली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांना जिल्ह्यात असा काही प्रकार घडला, याबाबत माहितीही नाही.