जयपूर 25 फेब्रुवारी : देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि त्या राज्यांमधील वेगवेगळ्या भागांमध्ये अतिशय वेगळ्या आणि अनोख्या परंपरा असतात. होळीच्या बाबतीत देशाच्या विभिन्न भागांमध्ये वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा आहेत. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. राजस्थानच्या भीलवाडा येथील एक परंपराही अशीच अनोखी आणि हैराण करणारी आहे. ‘अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे’ व्यक्तीची शेवटची इच्छा ऐकून बसेल धक्का इथे होळीनंतर सात दिवसांनी शीतला सप्तमीला विशेष पद्धतीने होळी खेळली जाते. या दिवशी जिवंत लोकांची अंत्ययात्रा काढली जाते. एका जिवंत व्यक्तीला झोपवलं जातं, त्याची अंत्ययात्रा भिलवाडा शहरातील चित्तोर वाले हवेलीपासून सुरू होणाऱ्या मुख्य रस्त्यांवरून काढली जाते. ही अंत्ययात्रा पाहण्यासाठी लांबून लोक येतात. लोक या अंत्ययात्रेमध्ये सोबत चालतात. ढोल वाजवत गाणे गात, नाचत आणि अश्लील घोषणा देत ही अंत्ययात्रा काढली जाते. शेवटी प्रवास मोठ्या मंदिराजवळ संपतो. याआधी, सरणावर झोपलेला माणूस उठतो आणि पळून जातो. नंतर सरणाचे अंत्यसंस्कार केले जातात. खरं तर सुख-दु:खात खंबीर राहून जीवन आनंदाने जगण्याचा संदेश जनतेला देणं, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. काय सांगता! चक्क कुत्रा ठरला ब्रेकअपचं कारण; या कारणामुळे तरुणीनं तोडलं प्रियकरासोबतचं नातं भिलवाडा येथील मोतबीर बहुरुपिया जानकीलाल भांड यांनी सांगितलं की, भीलवाडामध्ये सुमारे 500 वर्षांपासून अशाप्रकराची अंत्ययात्रा काढली जाते. शहरात राहणाऱ्या गेंदार नावाच्या वेश्येनं ही परंपरा सुरू केली. गेंदारच्या मृत्यूनंतर, स्थानिक लोकांनी त्यांच्या मनोरंजनासाठी ही यात्रा काढण्यास सुरुवात केली. आपल्यातील दुर्गुण दूर करून त्यांचे अंतिम संस्कार करणे ही चांगली गोष्ट आहे, असा संदेश यातून देण्यात आला.