जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे' व्यक्तीची शेवटची इच्छा ऐकून बसेल धक्का

'अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे' व्यक्तीची शेवटची इच्छा ऐकून बसेल धक्का

व्हायरल

व्हायरल

प्रत्येक व्यक्तीच्या काही आशा, आकांक्षा, इच्छा असतात. काहींना आपल्या जीवंतपणीच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात तर काहींच्या मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत काय केलं जावं याविषयी इच्छा असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : प्रत्येक व्यक्तीच्या काही आशा, आकांक्षा, इच्छा असतात. काहींना आपल्या जीवंतपणीच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात तर काहींच्या मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत काय केलं जावं याविषयी इच्छा असतात. काही लोकांच्या अनेक विचित्र इच्छा असतात. ज्याचा आपण कधी विचारही करु शकत नाही अशा काही लोकांच्या इच्छा असतात. याविषयीच्या अनेक घटनादेखील समोर आल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीची अशी इच्छा समोर आली, जी कुटुंबातील सदस्य पूर्ण करू शकत नाहीत, तर? असाच काहीसा प्रकार ब्रिटनमधील एका कुटुंबासोबत घडला. डेली स्टारच्या वृत्तानुसार, इयान ऍटकिन्सन नावाच्या व्यक्तीने लोकांच्या शेवटच्या इच्छेवर संशोधन केले, त्यानंतर त्याला एका ब्रिटीश व्यक्तीच्या इच्छेबद्दल सांगण्यात आले ज्याची इच्छा होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याचे तुकडे करून कुटुंबाला खायला द्यावे. नरभक्षक ब्रिटनमध्ये कायदेशीर नसल्यामुळे त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र व्यक्तीच्या इच्छेने सर्वांना धक्काच बसला. हेही वाचा  -  Viral Video : कोब्राला पाहून सिंहांची हवा झाली टाईट, पुढे जे घडलं पाहून व्हाल थक्क आपल्या देशात, लोकांना मरण्याबद्दल बोलणे आवडत नाही, परंतु काही धाडसी लोक आहेत, जे जिवंत असताना त्यांची शेवटची इच्छा व्यक्त करतात. त्याचे अंतिम संस्कार कसे करायचे ते आनंदाने सांगतात. मात्र सध्या समोरआलेल्या या विचित्र प्रकरणाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे कारण त्या व्यक्तीने सांगितले होते की, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे मांस कुटुंबातील सदस्यांनी खावे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, या व्यक्तीची इच्छा जरी ब्रिटनमध्ये पूर्ण होऊ शकली नाही, परंतु जर त्याचा जन्म सेनेमा नावाच्या जमातीत झाला असता तर ही इच्छा पूर्ण झाली असती. वास्तविक, या जमातीचे लोक अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाला पाने आणि इतर वस्तूंनी झाकतात. 30-40 दिवसांनी ते त्याला परत आणतात आणि उरलेला मृतदेह जाळतात. हे लोक सूप बनवतात आणि शरीर जाळल्यानंतर उरलेली राख पितात. ही प्रथा येथे परंपरेने पाळली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात