बॉयफ्रेंडवरुन रस्त्यावरच भिडल्या मुली
नवी दिल्ली, 23 मे : रस्त्यावर अनेक लोकांची भांडणं होत असतात. नवरा बायकोपासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, आई मुलगा, कॉलेजची मुली, मुली, अशा सर्वांच्याच भांडणाच्या घटना सोशल मीडियावर पहायला मिळतात. छोट्या गोष्टीपासून मोठ मोठी भांडणाचे व्हिडीओही सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरतात. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची वाढ झाली आहे. नुकतात मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन मुली एकमेकांशी अतिशय वाईट पद्धतीने भांडताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही मुली बॉयफ्रेंडवरुन भांडत असल्याचं समोर येत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन शाळकरी मुली जोरदारपणे एकमेकींना मारताना दिसत आहेत. प्रियकराबद्दल दोन मुलींमध्ये झालेल्या जोरदार वादाचे रूपांतर अचानक भांडणात झाले आणि दोघांनी एकमेकांना लाथा-बुक्के मारत एकमेकांचे केस ओढण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. आसापास काहीजण येऊन ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात.
बॉयफ्रेंडवरून दोन शाळकरी मुलींचे हे भांडण सध्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागले आहे. दोघांमधील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. @gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 39 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधच असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.