व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात असंख्य व्हिडीओ समोर येतात. त्यामुळे येथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. त्यात कधी ट्रेन, तर कधी रस्त्यावरील तर कधी लोकांच्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या मुंबई लोकलमधला असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये लोकलच्या डब्यात दोन तरुण मुलं बसलेली दिसत आहेत. त्यातील एकजण पेपरमध्ये गांजा टाकण्याची तयारी करत आहे. तर दुसऱ्याच्या हातात सिगारेट आहे. Video : ट्रेनमध्ये सिगारेट ओढत होती तरुणी तरुणी, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक त्याच्या पोस्टचा तपशील देताना, एका वापरकर्त्याने सांगितले की कसाराला जाणारी ट्रेन कुर्ल्याला पोहोचत होती तेव्हा त्याने हा व्हिडीओ बनवला. त्याने रेल्वे आणि पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्या विनंतीवर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. एका यूजरने व्हिडीओ शेअर करून मध्य रेल्वे, आरपीएफ आणि मुंबई पोलिसांना टॅग केले आणि त्याच्या ट्विटर पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मध्य रेल्वे, आरपीएफ, ट्रेनमध्ये याला परवानगी आहे का? दादरहून रात्री 11.05 च्या ट्रेनमध्ये ते दारूच्या नशेत आहेत, आता ट्रेन आता कुर्ल्याला पोहोचतेय. त्यांच्याकडे सिगारेटही आहेत.’
वापरकर्त्याने मुंबई पोलिसांना कारवाई करण्याची विनंतीही केली. या ट्विटला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. तक्रारीची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी GRP मुंबईच्या हँडलला टॅग करून त्याच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला.
हा व्हिडीओ काही दिवस जुना असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यावर पोलिसांनी एक्शन घेतल्यामुळे हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.