मुंबई : आयएएस अधिकारी टीना दाबीला कोण ओळखत नसेल? टीना डाबीया सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्या कधी त्यांच्या कर्तुत्वामुळे, तर कधी सैंदर्यामुळे तर कधी लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या. लोकांनी देखील त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडते.
पण सध्या त्यांच्याबद्दल एक अशी गोष्ट समोर आली आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. ही घटना त्यांच्या कॉलेज काळातील आहे.
अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय?
UPSC प्रमाणेच, टीना दाबी यांनी त्यांचं श्री राम कॉलेज (LSR) मध्ये देखील टॉप केलं आहे.
आयएएस झाल्यानंतर टॉपर टीना दाबी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी सभागृहात विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्या कॉलेजमधील एक किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे विद्यार्थांना मोटीवेश मिळालं.
कॉलेजच्या असेंब्ली हॉलमध्ये आयएएस टीना दाबी म्हणाल्या होत्या की, मला माझ्या अधीनस्थांसाठी एक चांगला आदर्श ठेवायचा आहे. मी स्वत: एक महिला असल्याने मला महिलांच्या प्रश्नांवर काम करायला आवडेल.
मला शिक्षण क्षेत्रावरही लक्ष केंद्रित करायचे आहे. मी माझ्या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देईन आणि मुलींना कोणत्याही भेदभावाचा सामना करण्यास प्रवृत्त करत राहीन आणि त्यांना हवे ते साध्य करण्यासाठी प्रेरित करेन.
टीना दाबी यांनी लेडी श्री राम कॉलेजमधून २०१४ मध्ये राज्यशास्त्र (ऑनर्स) पदवी मिळवली. महाविद्यालयाचे कौतुक करताना, दाबी म्हणाल्या की एलएसआरने तिला बनवलं आहे आणि तिला प्रगतीशील मूल्ये शिकवली. LSR तुम्हाला खूप दयाळू हृदय ठेवण्यास शिकवते आणि तुम्हाला एक चांगला नेता बनवते.
म्हणून वेळ न वागा घालवता संधी मिळवा आणि जीवनात तुम्हाला कोण बनायचे आहे. हे ठरवा आपण स्त्रिया आहोत पण हे पुरुषांचे जग आहे, त्यामुळे त्याच्याशी लढण्यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल.
टीना दाबी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जिल्हा दंडाधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्या 2015 साली UPSC टॉप राहिल्या. टीना दाबी केवळ यूपीएससीमध्येच नाही तर बारावीतही सीबीएसई टॉपर आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. टीना दाबी अनेक कारणांमुळे चर्चेत आहे, मग त्यांचे तिचे पहिले लग्न असो, घटस्फोट असो किंवा दुसरे लग्न असो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags:Ias officer, Social media, Top trending, Upsc exam, Upsc exam 2015