मुस्लीम राजकुमारी जिने केला हिंदू धर्माचा अभ्यास

जगात अनेक राजघराणे आहेत, ज्याबद्दल आपल्याला ठावूक देखील नाही.

तुम्ही ब्रिटच्या प्रिंसेस डायनाबद्दल ऐकलं असेल. पण सौदी अरेबियाच्या एका राज घराण्यातील अशीच एक प्रिंसेस आहे.

तिच्या सौंदर्यापुढे सगळेच फेल आहेत. या प्रिंसेसचं नाव आहे
अमीरा अल तावील

ती प्रसिद्ध उद्योगपती अल वालीद यांची एक्स वाईफ आहे.

जगभरातील राजेशाही लोकांच्या यादीत अमीरा अल तावीलचे नाव सर्वात वर येते.

या प्रिंसेसला ब्युटी विथ ब्रेन म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

अमिराचे वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झाले. तेव्हाच ती ५ अब्ज डॉलर्सची मालकिन बनली होती.

2013 मध्ये तिचा घटस्फोट झाला. यानंतर तिने युएईचा व्यापारी खलिफा बिन बुट्टी अल मुहैरीशी लग्न केलं.

प्रिंसेस अमीरा अल तावील अनेक कारणांमुळे चर्चेत असते. यातील एक म्हणजे तिचा धर्माचा अभ्यास.

मुस्लीम कुटुंबातील असूनही तिने इतर धर्मांचा अभ्यास केला आहे, ज्यामध्ये तिने हिंदू धर्माचा देखील अभ्यास केला आहे.

प्रिंसेस अमीरा अल तावील हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.