मृत्यूच्या जबड्यात तरुण (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
कैरो, 09 जून : आपलं कोण आणि परकं कोण हे वेळ आल्यावर, संकटातच समजतं. अशीच एक धक्कादायक घटना. ज्यात तरुण संकटात होता त्याचवेळी त्याच्यासोबत असलेली त्याची गर्लफ्रेंड त्याला एकटं सोडून पळाली. तरुण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. मृत्यूच्या दारात असताना गर्लफ्रेंड गेली आणि तो आपल्या वडिलांना हाका मारू लागला. पप्पा पप्पा ओरडत, तडफडत त्याचा जीव गेला. मृत्यूचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इजिप्तमधील ही भयंकर घटना आहे. एक 23 वर्षांचा रशियन तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत इजिप्तच्या बीच रिसॉर्टवर सुट्टी एन्जॉय करायला गेला होता. तो आणि त्याची गर्लफ्रेंड समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. आता आपल्यासोबत काय होणार आहे, याची कल्पनाही या दोघांना नव्हती. अचानक ते मृत्यूच्या दारात गेले. कसंबसं करून त्याची गर्लफ्रेंड मृत्यूच्या दारातून बाहेर पडली. बॉयफ्रेंडला तिथं एकटं ठेवून ती आपला जीव मुठीत धरून पळाली.
तरुण शेवटपर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत राहिला. पण शेवटी तडफडून तडफडून त्याचा जीव गेला. काळ्याकुट्ट अंधारात मृतदेहासोबत 2 भयानक नग्न महिला; हे CCTV फुटेज तुमचं मन विचलित करू शकतं व्हिडीओत तुम्ही पाहू शकता समुद्रात एक तरुण दिसतो आहे. तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मदतीसाठी हाका मारतो आहे. पप्पा वाचवा पप्पा वाचवा, असं ओरडताना त्याचा आवाज ऐकू येतो आहे. कदाचित घटनेवेळी मुलाचे वडीलही तिथं होते. काही लोक त्याला वाचवण्यासाठी बोट घेऊन गेले पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वडिलांच्या डोळ्यादेखत लेकाचा मृत्यू झाला आणि वडीलही काहीच करू शकले नाही. कारण तरुण समुद्राच्या पाण्यात बुडत होता असं नाही तर त्याच्यावर खतरनाक टाइगर शार्कने हल्ला केला होता. शार्कच्या जबड्यात तो होता. शेवटी शार्कने त्याला गिळलंच. व्हिडीओच्या शेवटी शार्क त्या तरुणाला गिळताना दिसते. पाण्यात रक्त पसरल्याचंही दिसतं. माहितीनुसार व्लादिमीर पोपोव्ह असं या मृत तरुणाचं नाव आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार हर्गहाडाच्या रेड सी रिसॉर्टमधील ही घटना आहे. बोंबला! घातलेली अंडरविअर अचानक पाण्यात विरघळली, स्विमिंग पूलमध्ये उतरताच शरीरावरून गायब; VIDEO VIRAL @nabilajamal_ ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेला हा मृत्यूचा थरारक व्हिडीओ. पाहूनच धडकी भरते.
ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार तरुणाचा बळी घेणाऱ्या या शार्कला पकडून मारल्याचंही सांगण्यात आलं आहे.