JOIN US
मराठी बातम्या / Viral / झाडावरुन उडी घेत थेट हरणाची मानच पकडली, अन्..; वाघाने केलेल्या खतरनाक शिकारीचा Live Video

झाडावरुन उडी घेत थेट हरणाची मानच पकडली, अन्..; वाघाने केलेल्या खतरनाक शिकारीचा Live Video

अचानक वाघाने झाडावरून उडी मारून त्याला पकडलं. वाघाने हरणाची मान पकडली. हरण सुटू नये म्हणून वाघाने त्याला मानेला पकडलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 मार्च : वाघ हा सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानला जातो. तो जंगलात असेल तर इतर प्राणी त्याच्या जवळ जायला घाबरतात. कारण हा प्राणी कधी हल्ला करेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तो इतक्या वेगाने हल्ला करतो की समोरच्या व्यक्तीला विचार करण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये वाघाने जंगलात फिरणाऱ्या हरणावर हल्ला केला. त्यानंतर जे घडतं ते हैराण करणारं आहे. Video : जेव्हा सिंह म्हशीसमोर येतो, शिकार नाही तर स्वत:चे प्राण वाचवण्याची येते वेळ @WildLense_India नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक हरिण जंगलात चारा खात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर अचानक वाघाने झाडावरून उडी मारून त्याला पकडलं. वाघाने हरणाची मान पकडली. हरण सुटू नये म्हणून वाघाने त्याला मानेला पकडलं. हरीण वारंवार आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतं, पण वाघ हा वाघ असतो. त्याने एकदा आपली शिकार पकडली तर तिचं वाचणं जवळपास अशक्य असतं.

संबंधित बातम्या

सुमारे 16 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये हरीण 10 सेकंद वाघाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत राहातं. पण वाघाच्या तावडीतून त्याला स्वत:ला सोडवता येत नाही. एकदाही संधी मिळाली, तर हरणाचा वेग खूप वेगवान असतो. काही तासाआधी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 42 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर व्हिडिओला 500 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. चवताळलेला हत्ती गर्दीत शिरतो तेव्हा..! सगळं सोडून धावू लागले लोक, तरी ‘तो’ तावडीत सापडलाच अन्.., VIDEO काही दिवसांपूर्वी आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक हरीण जंगलात विश्रांती घेत होतं. हे पाहून एक वाघ चतुराईने येतो आणि अगदी शांत होऊन हरणाच्या मागे बसतो. हरणाला आधी वाटतं की काही होणार नाही. म्हणून, ते लक्ष देत नाही. हरीण आरामात बसून राहतं. काही वेळाने वाघ थेट त्याच्यावर हल्ला करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या