नवी दिल्ली 12 मार्च : सोशल मीडियावर वन्यजीव आणि प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ समोर येत राहतात. यातील अनेक व्हिडिओ असे असतात, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. नुकताच एका महाकाय हत्तीचा व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये हत्ती जंगलाच्या मधून जाणाऱ्या वाहनात असलेला ऊस बाहेर काढताना दिसत होता. हे पाहून नेटकरी म्हणाले की, हत्तीने जंगलातून जाण्यासाठी चालकाकडून टोल टॅक्स वसूल केला आहे. अचानक रेसमध्ये धावणाऱ्या घोड्याच्या समोर आली महिला; वेगात प्राण्याने केली भयानक अवस्था, VIDEO यानंतर आता एका चवताळलेल्या हत्तीचा व्हिडिओ समोर आला आहे, जो चांगलाच व्हायरल होत आहे. हा हत्ती शहरातील रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहे. हत्ती शरीरानं भरपूर बलाढ्य असतात. त्यांच्या ताकदीपुढे मोठमोठी वाहनंही कमी पडतात. ग्रामीण भागात, तसंच जंगलाच्या आसपास असलेल्या भागात हत्ती अनेकदा लोकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही एक चवताळलेला हत्ती रस्त्याने धावताना दिसत आहे, यावेळी तो आपल्या वाटेत येणाऱ्या आणि आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तू आणि गाड्याही उचलून फेकत आहे. हत्तीचं हे रौद्र रूप पाहून लोकही घाबरून पळत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटरवर @Fun_Viral_Vids नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही लोक अचानक इकडे तिकडे रस्त्यावर धावू लागल्याचं या व्हिडिओत सुरुवातीला दिसत आहे. त्यानंतर रस्त्याच्या कडेला स्कूटी पार्क करणाऱ्या व्यक्तीवर हत्ती हल्ला करतो आणि नंतर स्कूटी पायाने तुडवून तोडतो.
व्हिडिओमध्ये हत्ती पुढे गेल्यानंतर काही लोक त्याचा पाठलाग करताना आणि व्हिडिओ बनवताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ 1.4 दशलक्ष पेक्षा जास्त म्हणजे 14 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर १८ हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत, हा हत्ती अतिशय धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.