JOIN US
मराठी बातम्या / Viral / खतरनाक वाघाला कुत्र्यासारखं हाकलण्याचा प्रयत्न; हडहड केलं अन्...; धडकी भरवणारा VIDEO

खतरनाक वाघाला कुत्र्यासारखं हाकलण्याचा प्रयत्न; हडहड केलं अन्...; धडकी भरवणारा VIDEO

संतप्त वाघाला पर्यटकांनी आणखी चिथवण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात

वाघाचा पर्यटकांवर हल्ला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 एप्रिल :  वाघ, सिंह, बिबट्या या खतरनाक प्राण्यां ची भीती वाटतेच. पण त्यांना प्रत्यक्ष पाहण्याची उत्सुकता असते. त्यासाठी लोक नॅशनल पार्क, जंगल सफारीवर जातात. अशाच एका जंगल सफारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात पर्यटकांना वाघ दिसला. हा वाघ संतप्त होता, त्यामुळे त्याला हाकलण्यासाठी पर्यटकांनी कुत्र्यासारखं हडहड केलं आणि पुढे धक्कादायक घडलं. हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सामान्यपणे आपल्यासमोर कुत्रा आला की त्याला हाकलवण्यासाठी आपण हडहड करतो. कुत्राही मागे हटतो, तो आपल्याजवळ येत नाही. पण एखाद्या वाघाला असं आपण हाकलवू शकतो का? जंगलात गेलेल्या पर्यटकांनी तेच केलं. त्यांनी एका खतरनाक वाघाला कुत्र्यासारखं हाकलण्याचा प्रयत्न केला. वाघ समोर येताच त्यांनी हडहड म्हटलं.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक गाडी रस्त्यावर उभी आहे. गाडी पाहताच जंगलातून एक वाघ बाहेर येतो. वाघ संतप्त आहे. तो गाडीकडे पाहून गुरगुरतो आहे. गाडीतील पर्यटकही घाबरले आहेत. एक महिला चला, चला असं म्हणत गाडी पुढे नेण्यास सांगत आहे. तर व्यक्ती घाबरू नको, म्हणते वाघाला कुत्र्यासारखं हडहड करत हाकवण्याचा प्रयत्न करते आहे. वाघ-सिंहाचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला श्वान; फायटिंगचा शेवट VIDEO मध्येच पाहा वाघ इतका संतप्त झाला आहे तो गाडीच्या दिशेने झेप घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी पर्यटक आपली गाडी पुढे नेतात. वाघ त्या गाडीच्या मागे काही अंतरापर्यंत धावत जातो. पण सुदैवाने तो त्या गाडीचा पाठलाग करत नाही. तर तिथंच रस्त्याच्या कडेला थांबतो. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जर कुणी तुमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल? असा सवाल त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना विचारला आहे. साधा साप समजून तरुणाने शेपटी खेचली आणि…, धक्कादायक शेवट; Shocking Video हा व्हिडीओ पाहून सर्वांना धडकी भरली आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हा हार्ट अटॅकचा मुव्हमेंट असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने जंगल सफारीवरच बंदी घालायला हवी अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या