बाथरूममध्ये दरोडा (फोटो - ट्विटर व्हिडीओ ग्रॅब)
वॉशिंग्टन, 30 जून : बँक, एटीएम, ज्वेलरी शॉपवर दरोडा पडल्याची प्रकरण तुम्हाला माहिती असतील. पण तुम्ही कधी कुणी बाथरूममध्ये दरोडा टाकल्याचं ऐकलं तरी आहे का? एक असाच विचित्र दरोडा चर्चेत आला आहे. सशस्त्र दरोडेखोरां चा चक्क बाथरूममध्ये दरोडा टाकला आहे. बाथरूममधील दरोड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अजब चोरी करणारे चोर कैद झाले आहेत. आता सामान्यपणे बँक, दुकान इथून पैसे, सोनं-चांदी, हिरे-मोती यांची चोरी किंवा लूट झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल पण बाथरूममधून चोरांनी काय बरं चोरलं असेल?, असा प्ऱश्न तुम्हाला पडला असेल. धक्कादायक म्हणजे बंदुकीच्या धाकावर हा दरोडा टाकण्यात आला होता. अमेरिकेतील चोरीची ही विचित्र घटना आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील एका मॉलमध्ये दोन चोर गेले. तिथं बाथरूममध्ये जाऊन त्यांनी चार मुलांना ओलीस ठेवलं आणि त्यांना लुटलं. आता त्यांच्याकडून काय लुटलं असेल, तर चक्क बूट. मंदिराबाहेर गुपचूप चपलांची चोरी सोडता कुणी बंदुकीच्या धाकेवर चपला चोरल्याचं तुम्ही ऐकलं तरी आहे का? पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. या चोरट्यांनी बंदुकीच्या धाकेवर चक्क फक्त बूट चोरले आहेत. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. कर्माचं फळ! कारचालकाला लुटलं, पुढच्याच क्षणी बाईकस्वार चोरांसोबत भयंकर घडलं; Shocking Video या अजब दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज इर्व्हिन पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. ज्यात इर्विन स्पेक्ट्रम सेंटरमधील सार्वजनिक शौचालयात दोन दरोडेखोरांनी प्रवेश करून बंदुका बाहेर काढल्याचं धक्कादायक फुटेज व्हिडिओमध्ये एक किशोरवयीन मुलगा आपला जीव वाचवण्यासाठी धावताना दिसतो आहे, तर बाथरूमबाहेर एक दरोडेखोर बंदूक धरलेला दिसत आहे. दुसर्या क्लिपमध्ये दरोडेखोर पार्किंग गॅरेजमधून फिरताना दिसत आहेत. ज्यात त्यांच्या हातात शूज आणि डोक्यावर बेसबॉलच्या टोप्या दिसत आहेत. VIRAL VIDEO - 150 रुपयांच्या मीठ चोरीसाठी 15 लाखांच्या गाडीतून आले; VIP चोरांची अजब चोरी सीसीटीव्हीत कैद एका व्यक्तीने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि राखाडी स्वेटपँट घातलेला दिसतो, तर दुसऱ्याने बॅगी काळी पँट आणि राखाडी टँक टॉप घातलेला दिसतो. दोन्ही हल्लेखोरांचे वय 15 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, दरोडेखोर तीन जोडे बूट आणि बेसबॉल कॅप घेऊन पसार झाले. कोणत्या ब्रँडचे शूज चोरीला गेले आहेत आणि शूजची किंमत किती आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. चोरट्यांचा तपास सुरू आहे.