दुसऱ्या मजल्याहून पडला अन् ..
नवी दिल्ली 18 मे : अनेकदा लोक घाईगडबडीत अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अॅपल स्टोरी लुटल्यानंतर एका व्यक्तीने अशी चूक केली, ज्यामुळे तो पकडला गेलाच. पण गंभीर जखमीही झाला. गैरवर्तन करणाऱ्याला तरुणीने शिकवला चांगलाच धडा; चप्पलांचा दिला चोप, Video Viral सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अॅपल स्टोअरमधून चोरी करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, तो दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो अपयशी ठरतो. पळून जाण्याच्या प्रयत्नात तो खाली पडतो. त्याला खूप गंभीर दुखापत होते.
हे सगळं घडूनही तो पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु दुखापत इतकी गंभीर होती की त्याला पळताही आलं नाही आणि तो तिथेच पडून राहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. त्या व्यक्तीची दुखापत पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलं. शी घटना पहिल्यांदाच समोर आलेली नाही. याआधीही अनेक वेळा असे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘कदाचित खाली पडल्यामुळे त्याची पाठ मोडली असावी.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘सावधानी हटी, दुर्घटना घटी.’ आणखी एका यूजरने लिहिलं, ‘चुकीचं काम करण्याचे परिणाम.’ हा व्हिडिओ आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.