जाहिरात
मराठी बातम्या / Viral / गैरवर्तन करणाऱ्याला तरुणीने शिकवला चांगलाच धडा; चप्पलांचा दिला चोप, Video Viral

गैरवर्तन करणाऱ्याला तरुणीने शिकवला चांगलाच धडा; चप्पलांचा दिला चोप, Video Viral

गैरवर्तन करणाऱ्याला तरुणीने दिला चोप

गैरवर्तन करणाऱ्याला तरुणीने दिला चोप

लोकांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे भांडण होत असतं. अनेकवेळा रस्त्यावरही ही भांडणे सुरु होतात. सोशल मीडियावर अशा भांडणांचे, मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 18 मे : लोकांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे भांडण होत असतं. अनेकवेळा रस्त्यावरही ही भांडणे सुरु होतात. सोशल मीडियावर अशा भांडणांचे, मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक मुलगी वृद्धाला चप्पलांचा चोप देत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी खूप रागावलेली असून ती त्या व्यक्तीवर चप्पलचा वर्षाव करत आहे. असा दावा केला जात आहे की त्या व्यक्तीने मुलीशी गैरवर्तन केले होते, त्यानंतर मुलीने चप्पलचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. तिसरा व्यक्ती तिला थांबवण्यासाठी तिथे पोहोचेपर्यंत मुलगी थांबली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे याविषयी काही स्पष्ट झालं नाहीये.

News18लोकमत
News18लोकमत

@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीवर भरपूर कमेंट आणि लाईक्स येत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओवर सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. दरम्यान, मुलींसोबत गैरवर्तन करतानाचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये काही मुली त्या व्यक्तींना चांगलीच अद्दल घडवताना दिसतात. त्यांना चोपही देतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात