JOIN US
मराठी बातम्या / Viral / चोर आहे की स्पायडरमॅन? चार मजली इमारतीवर असं चढला की पाहणारेही शॉक, Video Viral

चोर आहे की स्पायडरमॅन? चार मजली इमारतीवर असं चढला की पाहणारेही शॉक, Video Viral

व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती घराच्या मागे बांधलेला पाईप धरून वेगाने चढताना दिसत आहे. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला.

जाहिरात

चोर आहे की स्पायडरमॅन?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 14 मे : आजकाल गुन्हेगार अगदी बेधडक झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं आपण पाहत असतो. जिथे काही गुन्हेगार दिवसाढवळ्या लुटमार करताना दिसतात. तर काही दुकानांमध्ये चोरी करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर एका चोराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो स्पायडरमॅनप्रमाणे 4 मजली इमारतीच्या छतावर चढताना दिसत आहे. सोशल मीडियावर समोर येताच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वापरकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये चार मजली उंच इमारतीच्या छतावर एक व्यक्ती चोरीच्या उद्देशाने चढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती घराच्या मागे बांधलेला पाईप धरून वेगाने चढताना दिसत आहे. जे पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्याचवेळी, बहुतेक वापरकर्त्यांना यावर विश्वास बसत नाहीये. प्रँक करण्याची हौस महागात पडली; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, VIDEO बघून डोक्याला हात लावाल व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. जो @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक चोर इमारतीवर चढताना दिसत आहे. त्यानंतर ही घटना कॅमेऱ्यात चित्रित करणारा व्यक्ती चोराला आवाज देऊन घाबरवतो. यानंतर लगेचच ती व्यक्ती पाईपवर सरकत वेगाने खाली उतरू लागते. जे पाहून युजर्सही हैराण झाले आहेत.

संबंधित बातम्या

सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. जो वृत्त लिहिपर्यंत 93 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झालेले यूजर्स आपल्या प्रतिक्रिया कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ‘तिथून दगड फेकून मारा.’ आणखी एका यूजरने लिहिलं की, ‘आता सामान्य माणसाने काय करावं? येथे दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडतात. तिसर्‍या यूजरने लिहिलं की, ‘आवाज करून चोराची सगळी मेहनत वाया घालवली.’ आणखी एकाने लिहिलं की त्या माणसाकडे अद्भुत टॅलेंट आहे, परंतु तो चुकीच्या मार्गावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या